आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्रामीण स्तरावर ऑनलाईन एसटी तिकीट बुकिंग सुविधा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कोल्हापूर जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या ऑनलाईन एसटी तिकीट बुकिंगला ग्रामीण पातळीवर मोठा प्रतिसाद मिळत आहे. आजरा तालुक्यातील उत्तर ग्राम पंचायतीमध्ये ही योजना सुरू झाल्यानंतर आतापर्यंत चार लाख रुपयांची ऑनलाईन तिकीट विक्री झाली असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा परिषदेचे कायर्कारी अध्यक्ष डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र (संग्राम) अंतर्गत ही नवी योजना राबवण्यात आली आहे.

गावातील लोकांचा वेळ आणि पैसा वाचवण्याच्या हेतूने ही अनोखी योजना सुरू करण्यात आली आहे. नुकतेच संग्राम केंद्राना महाराष्ट्रातील नागरी सेवा केंद्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. याच धर्तीवर गेल्या तीन महिन्यांपासून उत्तर ग्राम पंचायतीत ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

राज्यातील इतर ग्रामपंचायतीमध्येही ही सेवा सुरू होणार आहे. लवकरच राज्यातील ८1 ग्रामपंचायतीमध्ये ऑनलाईन तिकीट बुकिंगची सुविधा सुरू होणार आहे.