आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमटीडीसीचा उपक्रम :सामाजिक कर्मभूमींना भेट "सोशल टुरिझम'चे पॅकेज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सामाजिक चळवळी आणि सुधारणावाद्यांची कर्मभूमी ठरलेल्या महाराष्ट्राची ओळख देश-विदेशात व्हावी यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सोशल टुरिझम ही आगळी संकल्पना आणली आहे. यात पर्यटकांना दर महिन्याला आनंदवन, हेमलकसा, राळेगण सिद्धी, हिवरेबाजार, सर्च अशा काही सामाजिक कार्यस्थळांना भेटी देता येतील. एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन-नानुटिया यांनी ही माहिती दिली. या मोहिमेत पर्यटकांचा प्रतिसाद वाढल्यास सहलींची संख्या वाढवण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. विद्यार्थी, अभ्यासक, कार्यकर्त्यांना सहली उपयोगाच्या ठरतील.
टूर पॅकेजचे स्वरूप
- एक ते ८ दिवसांचे पॅकेज
- २५ ते ५० पर्यटकांचा गट
या सुविधा
- पर्यटन विमा { नाष्टा, जेवण
- एसी/बिगर एसी वाहनाने प्रवास { प्रेक्षणीय स्थळांना भेटी { शक्य तेथे गाइड आणि निवासाची सोय.
ठिकाण व निवासखर्च
८६०-६२०० - मध्यम हॉटेल/ एमटीडीसी रिसोर्ट
आठ शहरांतून दरमहा टूर
- मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, रत्नागिरी
लोणार, गांधी सर्किट सहल
शाळा, काॅलेजच्या विद्यार्थ्यांसाठी लोणारचे (जि. बुलडाणा) सरोवर, गांधी सर्किटची सहल आहे. स्वातंत्र्यलढा व महात्मा गांधी यांचे कार्य कळण्यासाठी गांधी सर्किटचा समावेश आहे.
या सामाजिक स्थळांना भेटीची संधी
हेमलकसा
गडचिरोलीत प्रकाश आमटे यांचा लोकबिरादरी. दवाखाना, शाळा, प्राणी अनाथालय.
आनंदवन
बाबा आमटेंच्या प्रेरणेतील आनंदवन. महारोगी समितीचा सोमनाथ प्रकल्प. येथे २५० ते ३०० मुले राहतात.
सर्च ऊर्फ शोधग्राम
गडचिरोलीत डाॅ. अभय व राणी बंग दांपत्याने उभे केलेले कार्य. आरोग्यासोबतच शेती व इतर क्षेत्रातील उपक्रम.
हिवरेबाजार
हिवरेबाजार (जि. नगर) गावाचा पोपटराव पवार यांनी घडवून आणलेला कायापालट. आदर्श गावात लोकसहभागातून उपक्रम.

राळेगण सिद्धी
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील गाव. राज्यच नव्हे, तर देशाच्या सामाजिक चळवळींचे केंद्र ठरलेले हे गाव. आदर्श गाव म्हणून ओळख.
याशिवाय {विज्ञान आश्रम {संमती बालनिकेतन {ग्राम बाल शिक्षा केंद्रांनाही भेटी देता येतील.
लोणार, गांधी सर्किट सहल
शाळा, काॅलेजच्या विद्यार्थ्यांसाठी लोणारचे (जि. बुलडाणा) सरोवर, गांधी सर्किटची सहल आहे. स्वातंत्र्यलढा व महात्मा गांधी यांचे कार्य कळण्यासाठी गांधी सर्किटचा समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...