आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुक्ता यांना हस्तक्षेपास परवानगी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या सीबीआय चौकशीच्या मागणी याचिकेत त्यांच्या कन्या मुक्ता यांना हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाने सोमवारी परवानगी दिली. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला सात महिन्यांचा कालावधी उलटला तरीही पोलिसांना अजूनही मारेकर्‍यांचा शोध लागला नाही. त्यामुळे मुक्ता यांनी या प्रकरणाची चौकशी विशिष्ट तपास यंत्रणेकडून करावी, अशी मागणी केली आहे. यापूर्वीच पत्रकार केतन तिरोडकर यांनी याप्रकरणी याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणीत मुक्ता यांचेही म्हणणे ऐकून घ्यावे, असे हरदास यांनी सुनावणीदरम्यान सांगितले.