आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mulla Arrested For Attempting Rape On His Daughter

मुलीवर बलात्कार करणार्‍या युनानी डॉक्टरला अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या युनानी डॉक्टरला अटक केल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली. आरोपी डॉक्टरचे नाव मोहंमद सिद्दिकी असून तो विक्रोळीचा रहिवासी आहे. रविवारी रात्री मुलीने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीला एकूण 9 अपत्ये असून त्यात सात मुली आहेत. पीडित त्याची तिसरी मुलगी आहे. वडिलांनी वर्षभरात किमान सात वेळेस बलात्कार केल्याचा आरोप मुलीने केला आहे. बलात्काराची माहिती कुणाला दिल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकी आरोपीने मुलीला व अंथरुणावर खिळून असलेल्या पत्नीला दिली होती. मुलीने शेजार्‍याला हा प्रकार सांगितल्यानंतर आरोपीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली.