आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Multi Floors Building Blazed In Mumbai, 7 Died, 28 Injured

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईत बहुमजली इमारतीला आग; ७ जण ठार, २८ जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईतील काळबादेवी अग्नितांडव ताजे असतानाच शनिवारी सायंकाळी पवईतील लेक इमारतीला भीषण आग लागून ७ जणांचा गुदमरून मृत्यू झाला, तर २० जण जखमी झाले आहेत. जखमींवर पवईच्या हिरानंदानी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. रात्री उशिरा आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले.

शनिवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास पवई लेकच्या १४ व्या मजल्यावरील एका फ्लॅटमधील एसीमध्ये स्पार्किंग झाल्यामुळे आग लागल्याचे सांगितले जाते. ही आग १५ व्या माळ्यावर पसरली. त्याच दरम्यान लिफ्ट बंद करण्यात आली. या आगीतून बाहेर पडण्याचा
प्रयत्न करणारे लोक लिफ्टमध्येच अडकले. त्यात ७ जणांचा गुदमरून मृत्यू झाला. अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच आगीच्या तांडवाने त्यांचा बळी घेतला, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. मृतांतील चार जण एकाच कुटुंबातील आहेत.
अग्निशमन दलाचे कर्मचारी तेथे पोहाेचताच त्यांनी आग विझवीत असताना अडकून पडलेल्या ३२ जणांची सुटका केली. त्यानंतर तातडीने इमारत रिकामी केल्याने पुढची दुर्घटना टळली. काळबादेवीतील अग्नितांडवापासून धडा घेऊन ही आग दोन मजल्यांपेक्षा अधिक
पसरणार नाही, याची काळजी घेण्याचे मोठे काम अग्निशमन दलाने केले.