आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबादेवीत रोजचा दिवस यात्रेसारखाच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबादेवी मुंबईची ग्रामदेवता आहे. त्यामुळे मुंबईतील रहिवासी प्रत्येक शुभ कार्याच्या वेळी सर्वात आधी मुंबादेवीचीच आठवण करतो. समुद्रात येणाऱ्या प्रत्येक अडचणीपासून मुंबादेवीच आपल्याला सुरक्षित ठेवते, असा मुंबईच्या कोळी समाजाचा समज आहे. येथे नवरात्रीतच नव्हे तर वर्षभरात कधीही जा, यात्रेसारखीच गर्दी दिसेल. नवरात्रात येथे दररोज सुमारे ५० ते ६० हजार भक्त दर्शनासाठी येतात. रविवारी ही संख्या एक लाखावर गेली.
विविध रंगांनी सजलेला सभामंडप आणि चारही बाजूंनी असलेल्या प्रकाशमय वातावरणात मुंबादेवी विराजमान आहे. नवरात्रात हातात पूजेची थाळी घेतलेले हजारो भक्त रांगेत उभे असतात. या मंदिरात उजवीकडे अन्नपूर्णा देवी आणि हनुमानाची मूर्ती आहे. दक्षिण मुंबईच्या भुलेश्वरमध्ये स्थित मुंबादेवी मंदिरात दिवाळीच्या दिवशी मारवाडी समाज सकाळपासून संध्याकाळपर्यंत चोपडा पूजन करतो.
व्यापारात प्रगती व्हावी हा हेतू. येथे फक्त नैसर्गिक फुले आणि रंगांनीच सजावट करण्याची प्राचीन परंपरा आहे. दिवाळीसारख्या विशेष सणात मुंबादेवीच्या अष्टभुजा असलेल्या विराट रूपाचे दर्शन करण्याचे विशेष महत्त्व आहे. नवरात्रात देवीला शुद्ध तुपात तयार केलेल्या लाडूंचा विशेष नैवेद्य दाखवला जातो.
बातम्या आणखी आहेत...