औरंगाबाद - दहावी व बारावीच्या परीक्षांमुळे ६ मार्च रोजी मुंबईत नियोजित मराठा क्रांती मोर्चा पुढे ढकलण्यात अाला. रविवारी मोर्चा संयोजकांनी बोलावलेल्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला. तूर्तास मोर्चाची पुढील तारीख जाहीर करण्यात आली नाही.
६ मार्चला मुंबईत महामोर्चा काढण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांनी जाहीर केला होता. स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुकीत भाजपला मराठा समाजाने मतदान करू नये, असे आवाहनही करण्यात आले होते.
मात्र राज्यभरात भाजपने मुसंडी मारल्याने संयोजकांच्या उत्साहावर विरजण पडले. मोर्चाच्या काळात दहावी व बारावीच्या परीक्षा असल्याचे कारण यासाठी पुढे करत हा मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय मराठा क्रांती मूकमोर्चाच्या संयोजकांच्या औरंगाबादेत झालेल्या बैठकीत रविवारी घेण्यात आला. हा मोर्चा पुढे कधी निघेल, यावर चर्चा मात्र झाली नाही.