आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिला अत्याचारांत मुंबईची आघाडी, वर्षभरात राज्यात 1 हजार 900 बलात्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यात गेल्या वर्षात 1 हजार 839 बलात्कारांच्या गुन्ह्यांची नोंद झाली असून महिलांवरील अत्याचारांत मुंबईने राज्यात आघाडी घेतल्याची माहिती महाराष्‍ट्र पोलिस अहवाल 2012 मध्ये स्पष्ट करण्यात आली आहे.

जुलै महिन्यात राज्य गुन्हे अहवाल शासनाने प्रकाशित केला असून त्यात राज्यातील महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वर्षागणिक वाढत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

2010 मध्ये राज्यात 1 हजार 599 बलात्काराची नोंद होती. 2011 मध्ये हा आकडा 1 हजार 701, 2012 मध्ये 1 हजार 839 वर गेल्याची माहिती या अहवालात स्पष्ट करण्यात आली आहे. राज्यात नोंद होणºया एकूण गुन्ह्यांची तुलना केल्यास महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांचे प्रमाण 8 टक्के इतके आहे. 2012 मध्ये राज्यातील एक लाख महिलांच्या संख्येमागे 32 महिला अत्याचाराच्या बळी ठरल्या होत्या, असेही हा अहवाल सांगतो. 2011 ची तुलना करता 2012 मध्ये महिलांवरील अत्याचारांच्या प्रमाणात तब्बल 4 टक्के वाढ झाली आहे. राज्यात महिलांवरील अत्याचारांमध्ये मुंबई परिसराचा सर्वात मोठा वाटा असल्याचा हा अहवाल स्पष्ट करतो.

अत्याचारांचे प्रमाण
मुंबई 10.4 %, अहमदनगर 5.2 %, ठाणे 4.6 %, जळगाव 4.1 %, यवतमाळ 3.8%, बीड 3%, नांदेड 4%, पुणे 4%, उर्वरित महाराष्‍ट्र 57 टक्के असे महिला अत्याचारांचे गुन्हे 2012 मध्ये नोंद झाले आहेत.