आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई एयरपोर्टवर पॅराशूट्स नव्हे एयरबलून्स; दोघांना अटक, कंपनीवर गुन्हा दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी सायंकाळी 5 वाजून 55 मिनिटांनी संशयितरित्या उडवलेल्या मानवविरहित 5 छोट्या पॅराशूट्सप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दरम्यान, ही पॅराशूट नसून एयर बलून्स असल्याचे स्पष्ट झाले असून, ती एका खासगी इव्हेंट कंपनीने सोडल्याचे पुढे येत आहे. धर्मानंद डायमंड मर्चंट या इव्हेंट कंपनीने कलिना एयर इंडिया ग्राऊंडवर क्रिकेट सामन्यासाठी हे एअर बलून्स सोडल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, कोणतेही परवानगी न घेता विमानतळ हवाई क्षेत्रात एयरबलून्स पाठवल्याप्रकरणी संबंधित कंपनीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिरेक्यांच्या कायम हिटलिस्टवर असलेल्या मुंबई विमानतळावरील टर्मिनल 2 वर जेट एअरवेजचे अहमदाबादला जाणारे विमान उडण्याच्या तयारीत असताना वैमानिकाला हवाई उड्डाणमार्गात पाच छोट्या आकाराची मानवविरहित पॅराशूट्स दिसल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी इंडियन एयरफोर्स, नेवी, इंटेलिजन्स ब्यूरो, सीईएसएफ आणि मुंबई पोलिस आदी तपास यंत्रणांकडून स्वतंत्र चौकशी सुरु केली होती. कारण या घटनेची पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) गंभीर दखल घेतली होती. शनिवारी घडलेल्या या घटनेचा अहवाल पीएमओने मागवत ही विमानतळाच्या सुरक्षेत सर्वात मोठी चूक असल्याचे म्हटले होते.
कोणतीही पूर्वसूचना न देता हवाई क्षेत्रात इतक्या आतपर्यंत ही पॅराशूट्स कशी आली आणि त्यांचा हेतू काय होता, असा प्रश्न सध्या विमानतळ प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांना पडला होता. अखेर या घटनेला 60 तास उलटून गेल्यानंतर त्या पाच पॅराशूट्सचे गूढ उखलण्यात तपास यंत्रणांना यश आले. मात्र ती पॅराशूट्स नसून एयर बलून्स असल्याचे स्पष्ट झाले आहे. जेट एअरवेजचे विमान मुंबईहून अहमदाबादच्या दिशेने टेकऑफ करण्याच्या तयारीत असतानाच मुख्य वैमानिक दिनेशकुमार यांना अचानक कालिना परिसराकडून हवाई उड्डाण मार्गात पाच छोटे पॅराशूट्स उडत येताना दिसले. दिनेशकुमार यांनी त्वरित याची माहिती हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला (एटीसी)दिली. ही पाच पॅराशूट्स सुमारे सहा मिनिटे हवेत होती, त्यानंतर ती दिसेनाशी झाली होती.
या घटनेनंतर पॅराशूट्स आणि पॅराग्लायडिंगचे प्रशिक्षण देणाऱ्या मुंबईतील सर्व संस्था तसेच विमान उड्डाणाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची कसून चौकशी सुरु करण्यात आली. त्याचबरोबर हवामानाचा अंदाज घेण्यासाठी हवामान खात्याने ही पॅराशूट्स उडवली होती का? अशी विचारणाही तपास यंत्रणांनी हवामान खात्याकडे केली मात्र त्यांनी असे काही केले नसल्याचे सांगितले. त्यामुळे मुंबई विमानतळाची रेकी तर केली जात नव्हती ना? अशी भीती व्यक्त केली जात होती.
पुढे वाचा, या घटनेमुळे मुंबई विमानतळाच्या सुरक्षेत त्रुटी असल्याचे उघड....
बातम्या आणखी आहेत...