आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुंडगिरीत मुंबई पुणे अव्वल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आर्थिक विकासात अग्रेसर असणारी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुणे गुंडगिरीतही पुढे असल्याचे उघड झाले आहे. या दोन्ही शहरांमध्ये 2007 ते 2011 या कालावधित कायदा-सुव्यवस्थेला ठेच पोहोचणा-या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीत ही बाब उघड झाली आहे.
देशाची आर्थिक राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेले मुंबई आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे पुणे या दोन्ही शहरात 2007 ते 2011 या कालावधित कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचणा-या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. गुंडगिरी, सार्वजनिक ठिकाणी तोडफोड, जमावाचे बेकायदा कृत्य, अशा घटना मुंबई-पुण्यात झाल्या आहेत. आकडेवारीनुसार, 2007 ते 2011 या वर्षांत मुंबईत 1 हजार 675 गुन्ह्यांची नोंद झाली तर पुण्यात दोन हजार 271 गुन्ह्यांची नोंद झाली.
मुंबई रेव्ह पार्टी: अटकेतील 19 विदेशींमध्ये आयपीएल चिअर गर्ल्स?
जोडप्याचे अश्लिल चाळे रोखणाऱया सुरक्षारक्षकाचा पुणे विद्यापीठात खून