आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

26/11ची 9 वर्षे: कसाबला फासावर लटकावूनही \'देविका\' झोपडीमध्‍येच, हल्‍ल्‍यानंतर 6 शस्‍त्रक्रिया

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
26/11च्‍या हल्‍ल्‍यावेळी देविका 9 वर्षांची होती. आता ती 18 वर्षांची झाली आहे. - Divya Marathi
26/11च्‍या हल्‍ल्‍यावेळी देविका 9 वर्षांची होती. आता ती 18 वर्षांची झाली आहे.

मुंबई- दहशतवादी अजमल कसाबविरोधात साक्ष देणारी आणि त्‍याला फासावर लटकावण्‍यामध्‍ये महत्‍त्‍वाची भूमिका बजावणारी या हल्‍ल्‍यातील प्रत्‍यक्षदर्शी साक्षीदार देविका रोटवान हे नाव आता फार कमी जणांना लक्षात असेल. आज या भयंकर हल्‍ल्‍याला 9 वर्षे पुर्ण झाली. यानिमित्‍ताने आम्‍ही मुंबईतील एका झोपडीमध्‍ये राहणा-या देविका रोटवान हिची भेट घेतली. हल्‍ला झाला तेव्‍हा देविका 9 वर्षांची होती. आज ती 18 वर्षांची झाली आहे. ही कहाणी आहे या मुलीच्‍या संघर्षाची आणि तिच्‍या हिमतीची. त्‍याचसोबत सरकारी दाव्‍यांचा फोलपणा आणि लोकांच्‍या असंवेदनशीलतेचा चेहराही यानिमित्‍ताने समोर आला आहे. 

 

दहशतवाद्यांच्‍या भितीने नातेवाईकांनी फिरवली पाठ

या हल्‍ल्‍यानंतर नातेवाईक या कुटुंबाला आपल्‍या कोणत्‍याही कार्यक्रमात बोलवत नाहीत. तसेच लग्‍नाच्‍या पत्रिकेवर त्‍यांचे नावही छापत नाही. दहशतवाद्यांना याची माहिती झाल्‍यास आपल्‍याला त्रास होऊ शकतो, अशी भिती नातेवाईकांना वाटते. दहशतवादी हल्‍ल्‍यामध्‍ये गोळी लागल्‍यामुळे देविकाची 6 वेळेस शस्‍त्रक्रिया करावी लागली आहे. तसेच मागील एका वर्षापासून देविका टीबीने पिडीत आहे. तरीदेखील कुणीही या कुटुंबाच्‍या मदतीला येत नाही.   


दहशतवादी हल्‍ल्‍यामुळे कुटुंबाची परवड
- मुंबईतील एका चिंचोळ्या गल्‍लीमध्‍ये 8X12च्‍या एका झोपडीत देविका राहते. वडील नटवरलाल यांनी पलंगावर पहुडलेल्‍या देविकाशी आमची भेट घालून दिली. तिच्‍यासोबत तिचा भाऊ जयेशही होता. आईबद्दल विचारताच सर्व शांत झाले. तेव्‍हा वडीलांनी 2006मध्‍ये त्‍यांचे निधन झाल्‍याचे सांगितले.
- वडीलांनी सांगितले की, 'आम्‍ही मूळ राजस्‍थानमधील पाली जिल्‍ह्यातील आहोत. मात्र मागील 30 वर्षांपासून मुंबईमध्‍ये राहत आहोत. येथे आम्‍ही ड्रायफ्रूट्सचा व्‍यवसाय करत होतो. मात्र दहशतवादी हल्‍ल्‍यानंतर सर्व पैसे देविकाच्‍या उपचारावर खर्च झाले. व्‍यवसायायकडे लक्ष देता आले नाही. त्‍यामुळे सर्व धंदा चौपट झाला. सोबतच्‍या व्‍यापा-यांनी पूर्ण पैसे खाल्‍ले. आता सर्वात मोठा मुलगा म्‍हणजे देविकाचा मोठा भाऊ पुण्‍यात एका किराणा दुकानात काम करत आहे.'


सन्‍मान खूप मिळाला, त्‍याने पोट भरते का?
- देविकाने आम्‍हाला समोर भिंतीवर सजवण्‍यात आलेले पारितोषिके दाखवली.  बरेचशे बॉक्‍समध्‍ये ठेवून देण्‍यात आल्‍याचे तिने सांगितले.
- नंतर तिने अनेक नेत्‍यांसोबत काढलेले फोटो दाखवले. जयेशने एक निमंत्रण पत्रिका दाखवली. 26 नोव्‍हेंबरला गेट वे ऑफ इंडियावर होणा-या एका कार्यक्रमाची ती नियंत्रण पत्रिका होती. तो म्‍हणाला, या कार्यक्रमात मुख्‍यमंत्रीही सहभागी होणार आहेत. आम्‍हालाही बोलावण्‍यात आले आहे.'
- देविका म्‍हणाली, 'दरवर्षी आम्‍हाला देशभरातून वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमासाठी बोलावण्‍यात येते. तेथील रिबनही माझ्याच हस्‍ते कापली जाते.'
- नटवरलाल म्‍हणाले, 'सन्‍मान तर खूप मिळतो. मात्र याने पोट भरत नाही. 6 वर्षे आम्‍ही मागच्‍या गल्‍लीत राहत होतो. तेथील घरमालक आम्‍हाला म्‍हणाला, 'रोज टीव्‍हीवर दिसता. सरकारकडून कोट्यावधी रुपये मिळाले असतील. घरभाडे वाढवून द्या.' तेव्‍हा आम्‍ही तेथून शिफ्ट झालो आणि आता या घरात महिना 9 हजार रुपये देऊन राहत आहोत.'
- देविका म्‍हणाली, 'नातेवाईकांना वाटते की, आम्‍हाला सरकारकडून फार पैसे मिळाले असतील. मात्र सन्‍मान समोराहामध्‍ये जे काही 5-10 हजार रुपये मिळतात. त्‍याच्‍यावरुन कसेबसे आम्‍ही घरभाडे भरतो.'


जिल्‍हाधिका-यांपासून सीएम, पीएम ऑफीसकडेही केली मदतीसाठी याचना
- देविकाच्‍या वडीलांनी सांगितले की, 'हॉस्पिटलमध्‍ये भरती होतो, तेव्‍हा काँग्रेसचे अनेक मोठे नेते भेटण्‍यासाठी आले होते. त्‍यांनी आम्‍हाला आश्‍वासन दिले होते की, सरकारतर्फे त्‍यांची राहण्‍याची सोय केली जाईल. जिल्‍हाधिकारी कार्यालयाकडून एक अर्जही भरुन घेण्‍यात आला होता. तो अर्ज घेऊन मी जेव्‍हा जिल्‍हाधिका-यांना भेटायला गेलो तेव्‍हा ते म्‍हणाले, मागील जिल्‍हाधिका-यांनी तुम्‍हाला काय सांगितले, आम्‍हाला माहिती नाही.'
- नटवरलाल सांगतात की, याप्रकरणी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍याशीही अनेकदा भेट घेतली आहे. मात्र काही फायदा झाला नाही. घटनेनंतर सरकारी मदतीच्‍या नावाखाली आम्‍हाला मात्र 3 लाख 25 हजार रुपये मिळाले.
- नटवरलाल यांनी सांगितले की, स्‍पेशल कोर्टाने सरकारला परिवारच्‍या राहण्‍याची आणि मुलीच्‍या शिक्षणाची सोय करण्‍याचे सांगितले होते. मात्र अधिकारी सांगतात की, आम्‍हाला कोर्टाच्‍या आदेशाची प्रत दाखवा. मात्र कोर्टाने हे मौखिक सांगितले होते. त्‍याची प्रत कुठून आणू.
- देविकाने सांगितले की, 'मागील वर्षी 12 ते 18 फेब्रुवारीदरम्‍यान मोदींना आणि त्‍यांच्‍या अधिकृत पीएमओ ट्विटर अकांऊटवर अनेक ट्विट केले. मात्र दोन वर्षांपासून मोदीजींचा एकही रिप्‍लाय आला नाही.'   


पुढील स्लाइडवर पाहा, फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...