आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई: महिला रिक्षाचालकांनी घेतली राज ठाकरेंची भेट, मानले आभार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईतील मुलुंड परिसरातील महिला रिक्षाचालकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकूंज निवासस्थानी भेट घेतली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठपुराव्यामुळे मुलुंडमधील महिलांना रिक्षाचे परवाने मिळाले म्हणून सुमारे 100 महिलांनी राज यांची भेट घेत आभार मानले.

 

मनसेच्या वाहतूक विभाग शाखेने मुलुंडमधील महिलांना लर्निंग लायसन्सपासून ते परमिटपर्यंत मदत केली होती. सोबत परमिट काढताना जे शुल्क भरावे लागते ते सरकारने वाढविले आहे. हे शुल्क पूर्वी 200 रूपये होते ते आता राज्य सरकारने पंधरा हजार रूपये केले आहे. त्यामुळे हे शुल्क मागे घ्यावे किंवा कमी करावे यासाठी मनसे व राज ठाकरे यांनी पाठपुरावा करावा अशी मागणी या महिलांनी केली. राज ठाकरे यांनी महिलांचे म्हणणे सविस्तर ऐकून घेतले. सोबतच याशिवाय रिक्षा चालवताना इतर काही अडचणी आल्यास पक्षाच्या कार्यकर्त्यांशी किंवा थेट माझ्याशी संपर्क साधा असे राज यांनी महिलांना सांगितले.

 

हजारो मराठी तरुणांना-तरुणींना रेल्वे सेवेत कायम केले. यापुढेही स्थानिकांच्या रोजगाराच्या न्याय्य हक्कांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातत्याने लढतच राहील, असे राज यांनी यावेळी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...