आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत पोलिसांच्याच वाहनाची चोरी; रोज 8 वाहनांवर चोरट्यांचा डल्ला, गुन्ह्यांची उकल कमीच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पोलिसांच्या वाहनांची चोरी होत नाही, असा सर्वसामान्यांचा समज असतो. या समजाला छेद देणारी घटना शहरात घडली आहे. भोईवाडा पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नायगाव पोलिस वसाहतीतून शैलेश पवार या ट्रॅफिक हवालदाराची दुचाकी चोरीला गेली आहे.
 
शैलेश पवार हे दिंडोशी वाहतुक विभागात हवालदार पदावर कार्यरत आहेत. शुक्रवारी रात्री ड्युटी संपवून नेहमीप्रमाणे ते घरी परतले आणि इमारत क्रमांक 4 च्या खाली त्यांनी आपली दुचाकी पार्क केली. पवार हे याच इमारतीत दुसऱ्या मजल्यावर राहतात.
 
शनिवारी सकाळी उठून पाहिल्यावर दुचाकी जागेवर नसल्याचे त्यांच्या निर्दशनास आले. सर्वत्र शोधाशोध करूनही बाईक सापडेना तेव्हा त्यांनी अखेरीस भोईवाडा पोलीस स्टेशनवर बाईक चोरीची रितसर तक्रार नोंदवली. मुंबईत दररोज 8 वाहने चोरीला जातात. 1 जानेवारी 2017 ते 30 सप्टेंबर 2017 याकाळात मुंबईत 2160 वाहन चोरीच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. मात्र यातील केवळ 644 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
बातम्या आणखी आहेत...