आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशियातील दुसरी मोठी झोपडपट्टी मुंबईत, एका झोपडीची किंमत चक्क 1 कोटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईतील धारावी ( फाईल फोटो) - Divya Marathi
मुंबईतील धारावी ( फाईल फोटो)
मुंबई- कांदिवलीतील दामूनगर भागातील झोपडपट्टीला सोमवारी भीषण आग लागली. यात आगीत 500 हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. चौकशीत समोर आले आहे की एका घरातील सिंडिलर लीक झाल्याने आग लागली. बघता बघता या आगीने संपूर्ण झोपडपट्टीला वेढा घातला. या घटनेनंतर मुंबईतील झोपडयांची उंची 14 फूटावरून 18 फूट करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. मुंबईत कोट्यावधी लोक झोपडपट्टीत राहतात. मुंबईतील धारावी झोपडपट्टी आशियातील सर्वात मोठी दुसरी झोपडपट्टी आहे. येथील एका झोपडीची किंमत कोटी रूपयांत आहे. तसेच या झोपड्यातून अब्जावधी रूपयांचा व्यवसाय चालतो. आम्ही सांगणार आहोत मुंबईतील धारावी झोपडपट्टीबाबत...
धारावी काय आहे-
मुंबईच्या माहिम स्टेशनच्या जवळच ही सर्वात मोठी झोपडपट्टी वसली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार येथे जवळपास एक लाख लोक राहतात. असे म्हणतात की, सरकारी आकड्यांपेक्षा कित्येक पटीने जास्त लोक येथे राहातात. येथे संपूर्ण देशातील अनेक गरीब लोक आपल्या कुटुंबासमवेत राहतात. स्लम टूरिझम भारतातील एक नव्या पर्यटन स्थळाच्या रुपाने उदयास आले आहे, ज्याला पाहाण्यासाठी दररोज शेकडो विदेशी पर्यटक या झोपडपट्टीत येतात. बॉलिवूडचे सुप्रसिध्द चित्रपट निर्माता रोहित शेट्टी एकदा म्हणाला की, जेव्हा मी परदेशात जातो तेव्हा तेथील लोकं मला मुंबईतील या नव्या पर्यटन स्थळाबद्दल मला विचारतात. तेव्हा मला खुप वाईट वाटते.
झोपड्याची किंमतही कोटींच्या घरात-
धारावीतील एका झोपड्याची किंमत 1 कोटीपर्यंत पोहचली आहे. आता येथील 1 sq feet जागेची किंमत सुमारे 25,000 ते 30,000 इतकी आहे. दिसायला व म्हणायला ही झोपडपट्टी आहे मात्र, यात इतक्या खोल्या असतात व त्यात अनेक प्रकारचे व्यवसाय चालतात.
अब्जावधी रूपयांचा व्यवसाय होतो धारावातून...
धारावीत राहणारे लोक आपल्या छोट्याशा घरातच व्यवसाय चालवतात. यात चामडी, टेक्सटाईल आणि घड्याळाची इंडस्ट्रीज अधिक आहे. आपल्याला हे वाचून आण ऐकून आश्चर्य वाटेल की येथे सिंगल रूममध्ये बनलेला मालही एक्सपोर्ट होतो. यात अनेक असे व्यवसाय ज्यांचा व्यवसाय करोडो, अब्जावधीचा आहे. मात्र, एवढी वर्षे एकाच जागेवरून बिझनेस केला तरी ते बाहेर आपले युनिट शिफ्ट करीत नाहीत.
मुंबईच्या बाहेरील लोक स्थिरावलेच धारावीत-
धारावीत मुख्यतः मुंबईच्या बाहेरून आलेले लोक राहतात. जे रोजगाराच्या शोधात आले ते धारावीत राहणे पसंत करतात. 1880 मध्ये इंग्रजांनी वसवलेल्या धारावीची स्थिती आज खूपच खराब आहे. लोकसंख्या वाढल्याने येथील झोपड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे झोपड्यांची संख्या व त्याची उंची इतकी वाढली आहे की वरून पाहिले तर धारावीतील जमिन आकाशातून दिसतच नाही.
प्रत्येक पक्षाची व्होट बॅंक-
भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतरही धारावीत कोणताही बदल झाला नाही. मात्र, येथील झोपड्यांची संख्या वाढत राहिली. बोगस सर्टिफिकेट बनवून अमेक लोग येथे राहू लागले आहेत. यावर प्रत्येक राजकीय पक्ष आपला दावा ठोकतो. मात्र, मागील 15 वर्षापासून धारावी विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसचाच उमेदवार निवडून येत आहे. 2014 मध्ये काँग्रेसच्या वर्षा गायकवाड धारावीतून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.
स्लमडॉग मिलेनियर चित्रपट आणि धारावी झोपडपट्टी
मुंबईची ही झोपडपट्टी सर्वात मोठी झोपडपट्टी मानली जाते. काही वर्षांपूर्वी याच भागावर आधारीत 'स्लमडॉग मिलेनियर' या चित्रपटाचे चित्रिकरण याच भागात झाले होते. या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारही मिळाला होता.
परदेशी पर्यटकांची पहिली पसंद-
जनावरांप्रमाणे माणूस येथे कसा राहतो हे पाहण्याची उत्सूकता विदेशी पर्यटकांना धारावीत खेचून आणते. अनेक विदेशी कंपन्या धारावी फिरण्यासाठी विशेष पॅकेज आणि टूर गाईड सुध्दा या विदेशी पर्यटकांना पुरवतात.
पुढे स्लाईड्सच्या माध्यमातून पाहा, धारावीचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...