आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई: मुंबईतील ओशिवारा भागातील एका रेस्टॉरन्टमध्ये पोलिसांनी छापेमारी करून देहविक्रीच्या धंद्याचा भांडाफोड केला. 'बर्थ डे' पार्टीच्या नावाखाली दलाल महाविद्यालयीन विद्यार्थिनी आणि मॉडेल्सकडून देहविक्री करवून घेत होते. या प्रकरणी चार दलालांसह 11 तरूणींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या समाज सेवा शाखेने ही कारवाई केली.
ओशिवारा भागातील 'मसाला करी रेस्टॉरन्ट'मध्ये 'बर्थ डे' पार्टीच्या नावाखाली कुंटणखाना सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारावर पोलिसांनी 'मसाला करी'वर धाड टाकून देहविक्रीचा धंदा उधळून लावला. हॉटेल मालकाच्या मदतीने काही दलालांनी येथे देहविक्रीचा मोठा बाजार मांडला होता.
दलाल ब्लॅकबेरी फोनद्वारा महिला, तरुणींना संदेश पाठवून पार्टीत बोलवून घ्यायचे. त्यानंतर बर्थ डे पार्टी आयोजित केली असल्याचे खोटे सांगून ग्राहकांना आमंत्रित करायचे. यासाठी ग्राहकांकडून प्रती व्यक्ती तीन हजार रूपये घेत. महाविद्यालयीन तरूणी आणि महिलांना मात्र मोफत प्रवेश दिला जात होता.
आपल्या ग्राहकांना पार्टीत सहभागी झालेल्या तरुणींशी ओळख करून दिली जात असे. डिंक्स घेतल्यानंतर कोणत्या तरुणीसोबत जायचे ते ग्राहकच ठरवत होते. तरुणी पाहून यासाठी मोठी बोली देखील लावली जात असल्याचेही पोलिससूत्रांनी सांगितले.
या प्रकरणी पोलिसांनी पार्टी आयोजक मोहन तोलाणी, टीना ऊर्फ अनिता छाबडा, रेस्टॉरन्ट मालक नावेद बैजी आणि व्यवस्थापक चक्रधर जालंधर यांना अटक केली आहे. आरोपींना माझगाव येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना 11 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून तरुणींना चेंबूर येथील महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
बीडमध्ये वाचनालयातच चालतो कुंटणखाना; 5 जण अटकेत
देहविक्री करणार्या परदेशी कॉलगर्ल्सचा पर्दाफाश
टुरिस्ट व्हिसावर विदेशी ललना करतात बॉलीवुडमध्ये देहविक्री
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.