आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात खांदेपालटाचे संकेत, भाजप प्रदेशाध्यक्षांसह या मंत्र्यांची होणार उचलबांगडी?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. सोबतच राज्य मंत्रिमंडळातल्या खांदेपालटाची जोरदार चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. अनेकांना मंत्रिपद गमवावे लागण्याची तर नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची जोरदार चर्चा आहे. मात्र, अद्याप भाजपकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही.

हेही वाचा... मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप प्रदेश कार्यकारणीची बैठक, डागाळलेल्या मंत्र्यांची हकालपट्टी होणार?

फडणवीस सरकारला दिवाळीत 3 वर्षे पूर्ण होत आलेत. लोकसभेसोबत विधानसभा झाली तर फक्त दीड वर्ष हातात आहे. अशावेळी दानवे, मेहता, सावरा, देसाईंसारख्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून मतदारांना सामोरे जाणे लज्जास्पद ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मंत्र्यांच्या इमेज मेकओव्हरपेक्षा मंत्री बदलणे जास्त फायद्याचे असेल.

रावसाहेब दानवेंची गच्छंतीची दाट शक्यता
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह काही अतिकार्यक्षम तर काही अकार्यक्षम मंत्र्यांची हंडी फुटणार हे नक्की झाले आहे.
 
शेतकऱ्यांबद्दल केलेले 'ते' आक्षेपार्ह वक्तव्य, त्यानंतर लक्ष्मीदर्शन घेण्याचा सल्ला आणि आता थकवलेले वीज बिल यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे अडचणीत सापडले आहे. त्यांच्या गच्छंतीची दाट शक्यता आहे.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा... भाजप प्रदेशाध्यक्षांसह या मंत्र्यांची होणार उचलबांगडी?
बातम्या आणखी आहेत...