आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Bjp Unit Chief Ashish Shelar Answered Raj Thackeray On Cartoon

राज ठाकरेंनी राजकारण सोडून आता फुलटाईम कार्टुनिस्ट व्हावे- आशिष शेलार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज ठाकरे यांनी यापुढील काळात राजकारण सोडून फुलटाईम कार्टूनिस्ट व्हावे असा सल्ला मुंबई भाजपचे अध्यक्ष व आमदार आशिष शेलार यांनी दिला आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्याने राज यांच्याकडे कोणतेही सांगण्यासारखे काम नाही. त्यामुळे प्रसिद्धीत राहण्यासाठी राज मोदींसारख्या बड्या नेत्यांवर टिप्पणी करीत आहेत, अशी टीकाही शेलार यांनी केली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पुरते पानिपत झाल्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी काढलेले व्यंगचित्र भाजपच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच दिल्लीतील भाजपच्या पराभवाबाबत राज ठाकरेंनी जबाबदार धरल्यानंतर मोदी-शहा जोडगळीवर व्यंगचित्र काढून या पॉवरफुल नेत्यांच्या सत्तेला अरविंद केजरीवाल यांनी कसा हादरा दिला ते व्यंगचित्रातून दाखविले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या दिल्ली निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाला. भाजपने सर्व ताकदीनिशी निवडणूक लढवूनही पक्षाला केवळ तीन जागा मिळाल्या. नरेंद्र मोदींसह बड्या नेत्यांच्या 300 पेक्षा जास्त सभा दिल्लीत झाल्या. 120 पेक्षा जास्त पक्षाच्या खासदारांना प्रचारात जुंपून हवा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. भाजपचे देशभरातील कार्यकर्ते दिल्लीत येऊन पक्षाचा प्रचार करीत होते. एवढेच नव्हे तर केजरीवालांना टफ देण्यासाठी त्यांच्याच एकेकाळच्या सहकारी किरण बेदींना उतरवून केजरीवालांना पराजित करण्याचा चंग अमित शहा व मोदींनी बांधला होता. त्यामुळेच साम, धाम, दंड या सर्व आयुधांचा वापर करूनही दिल्लीकर जनतेने भाजपला साफ नाकारले. त्यामुळे भाजपला केवळ 3 जागांवर यश मिळवता आले.
हाच संदर्भ देत राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासह देशभरातील मोदी विरोधक व भाजपविरोधी पक्षांनी दिल्लीतील भाजपच्या पराभवाला नरेंद्र मोदी हेच कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे भाजपचे नेते सैरभैर झाले आहेत. त्यातच राज्यात मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेही मोदींवर लागोपाठ दिवस टीका केली आहे. आता त्यांचे बंधू व मोदींचे एकेकाळचे समर्थक राज ठाकरे यांनीही त्यांच्यावर हल्लाबोल केल्याने भाजप अस्वस्थ आहे.
पुढे पाहा, राज ठाकरेंनी मोदी-शहा जोडगळीवर काढलेले व्यंगचित्र व त्याचा अर्थ...