आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोळ्यांवर पट्टी बांधून बनवते मातीची गणेश मूर्ती; 17 वर्षांत बनवल्या 3 लाखांहून अधिक मूर्ती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 'गणेशोत्सव' हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव. अबालवृद्धांपासून सर्वांना हव्याहव्याशा वाटणार्‍या बाप्पांच्या आगमनासाठी सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहे. बाप्पांच्या स्वागताची तयारी करण्यासाठी राज्यात एकच धावपळ सुरु झाली आहे.

या अनुषंगाने आम्ही आपल्याला एका महिला मूर्तीकाराची माहिती घेऊन आलो आहे. ही महिला डोळ्यांवर पट्टी बांधून मागील 17 वर्षांपासून गणेश मूर्ती बनवत आहे. तीन आतापर्यंत 3 लाखांहून अधिक गणेश मूर्ती बनवल्या आहेत. रमा असे महिला मूर्तीकाराचे नाव आहे. रमाने काल (शुक्रवारी) डोळ्यांवर पट्टी बांधून पुन्हा गणेश मूर्ती साकारली.

रमाने पटकावे आहेत अनेक पुरस्कार...
- रमाने अवघ्या तीन मिनिटात सर्वात लहान गणेश मूर्ती बनवल्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे.
- रमाने आजपर्यंत अनेक पुरस्कारांना गवसणी घातली आहे. अमेरिकेतील सुप्रसिद्ध शो 'रिप्‍लीज बिलीव्ह इट ऑर नॉट'च्या पॅनलमध्ये दिसली होती.
- 99 दिवसांत डोळ्यांवर पट्टी बांधून 9,999 गणेश मूर्ती बनवल्याने तिला या शोमध्ये एंट्री मिळाली होती.
- रमाने गणरायाचे 18 हजारांहून रुपे साकारून ते प्रदर्शन ठेवले होते. 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड'मध्ये रमाच्या नावाची नोंद करण्यात आली आहे.

छंद म्हणून साकारते गणेश मूर्ती..
- रमा एक गृहिणी आहे. मुलांना ती आर्ट अँण्ड क्राफ्टचे ट्रेनिंग देते.  
- रमाला गणेश मूर्ती साकारण्याचा छंद आहे. तिने मागील 17 वर्षांपासून विविध आकारात तीन लाखाहून अधिक गणेश मूर्ती बनवल्या आहेत.
- रमाने 2004 मध्ये गुजरातमधील भावनगर येथे डोळ्यांवर बांधून गणेश मूर्ती बनवली होती. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना तिने ही मूर्ती भेट केली होती.

डोळ्यांवर पट्टी बांधून गणेश मूर्ती साकारणार्‍या रमाचे निवडक फोटो पाहाण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...