आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Borivali Train Accident 55 Years Old Women Dead

VIDEO: एक्स्प्रेसमधून उतरताना तोल गेल्याने प्लॅटफॉर्मच्या पोकळीत चिरडून महिलेचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- चालत्या एक्स्प्रेसमधून घाईघाईत उतरताना तोल गेल्याने एका महिलेचा दुदैवी मृत्यु झाल्याची घडना उघडकीस आली. ही दुर्घटना बोरीवली स्टेशनवर 15 जानेवारीला पहाटे चार वाजेदरम्यान घडली. किरणदेवी कोठारी (55) असे मृत महिलेचे नाव आहे.

किरणदेवी कोठारी या मुलुंड येथे राहाणार्‍या भावाला भेटण्यासाठी बडोदा एक्स्प्रेसने मुंबईला येत होत्या. त्यांचा भाचा तरुण सिंघवी हा देखील त्यांच्यासोबत होता. एक्स्प्रेस बोरीवली स्टेशनच्या पाचव्या प्लॅटफॉर्म पहाटे 3 वाजून 50 मिनिटांना पोहोचली. एक्स्प्रेसला थांबा कमी असल्याने ती 4 वाजता निघत असताना किरणदेवी व तरुण उतरण्यासाठी घाई करू लागले. तरुण खाली उतरला. त्याने एक-एक करून बॅगाही उतरवल्या. मात्र, किरणदेवी उतरत असताना त्यांच्या तोल गेला. त्या प्लॅटफॉर्मवर कोसळल्या. तरुण त्यांना सावरत असताना त्या प्लॅटफॉर्म व रेल्वेमध्ये असलेल्या गॅपमध्ये ओढल्या गेल्या. तरुणने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. प्रवाशांनी आरडाओरड केल्यानंतर एक्स्प्रेस थांबवण्यात आली. मात्र, तोपर्यंत फारच उशीर झाला होता. किरणदेवींचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, रेल्वेच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली ही विचित्र दुर्घटनेचा व्हिडिओ काही वृत्तवाहिण्यांनी प्रसारीत केल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

पुढील स्लाइडवर पाहा, बोरीवली स्टेशनवरील विचित्र दुर्घटनेचे फोटो व व्हिडिओ...