आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईच्या इमारतीला आग, अग्निशमन अधिकाऱ्यासह सात जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईच्या काळबादेवी परिसरातील जुन्या हनुमान गल्लीतील एका जुन्या इमारतीला शनिवारी भीषण आग लागली. यात मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील नेसरीकर यांच्यासह सात जण जखमी झाले आहेत. गोकुळ निवास भागातील ३३ क्रमांकाच्या इमारतीत दुपारी ४ वाजेच्या सुमारास दुरुस्तीचे काम सुरू होते. तेव्हाच ही आग लागली. अग्निशमन
दलाच्या २२ गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. जवान आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. तेवढ्यात इमारत कोसळली आणि काही जवान ढिगाऱ्याखाली सापडले. दोघांना बाहेर काढण्यात आले. परिसरात दाटीवाटीने उभ्या असलेल्या इमारती व अरुंद जागांमुळे दलाला इमारतीपर्यंत पोहोचण्यात अडथळे आले.

जीवितहानी नाही
अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियत्रंण मिळवत असतानाच या इमारतीचा काही भाग कोसळल्याने अडथळे निर्माण झाले. दरम्यान, या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.