आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

26/11 हल्ल्याच्या सहा वर्षांनंतर पुन्हा सुरू झाले मुंबईतील छाबड सेंटर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो : नवीन रुप मिळालेल्या सेंटरचा मुख्य हॉल)
मुंबई - 26/11 हल्ल्याच्या सहा वर्षांनंतर मुंबईच्या नरीमन हाउस येथील छाबड सेंटर आजपासून पुन्हा सुरू होत आहे. जगभरातून आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी तयार करण्यात आलेल्या या सेंटरच्या ओपनिंग सेरेमनीसाठीही खास तयारी करण्यात आली आहे. या कार्यक्रमात याठिकाणी प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली अप्रण केली जाईल. हल्ल्यातील अनेक खुणा अजूनही इमारतीवर स्पष्टपणे दिसत असल्या तरी, इमारतीला पूर्णपणे नवे रुप देण्यात आले आहे.

नोव्हेंबर 2008 मध्ये ही इमारत पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांचे मुख्य लक्ष्य होती. दहशतवादी सलग चार दिवस या इमारतीत लपलेले होते. कमांडो ऑपरेशननंतर दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले असले तरी, त्यात सहा जणांचा बळीही गेला होता.

सेंटर पुन्हा नव्याने तयार
या हल्ल्यानंतरहबी छाबड-लुबविच ग्रुपने मुंबईच्या विविध भागांमधून आपले काम सुरू ठवले होते. पण आता कुलाबा परिसरातील ही सहा मजली इमारत पूर्णपणे तयार आहे. अशियातील विविध भागांतील 25 जणांना उद्घाटन सोहळ्यासाठी आमंत्रित केले आहे. इमारतीच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर संग्रहालयही तयार करण्यात आले आहे.

छाबडा सेंटर
मुंबईचे छाबड-लुबविच सेंटर भारतातील यहुदींचे एक प्रमुख ठिकाणी आहे. वेगाने वाढणारी ही संघटना 80 देशांमध्ये 3500 हून अधिक संस्था चालवते.
पुढे वाचा, छाबड सेंटरचे नव्या रुपातील PHOTO