आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: हायटाईडचा धोका, नेव्हीला अलर्ट; विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईला हायटाईडचा मोठा धोका आहे. - Divya Marathi
मुंबईला हायटाईडचा मोठा धोका आहे.
मुंबई- गेल्या 24 तासांपासून कोसळत असलेला मुसळधार पावसाने मुंबईतील जनजीवन कोसळले आहेत. मुंबईत कालपासून सातत्याने जोराचा पाऊस पडत असल्याने संपूर्ण मुंबई शहरात पाणी तुंबले आहे. सर्व रस्ते, रेल्वेमार्ग व सखल भागात सर्वत्र पाणीच पाणी साचलेले दिसत आहे. गेल्या दहा वर्षात जून महिन्यांत पडलेल्या पावसाच्या सरासरीची नोंद यावर्षी उच्चांकी झाली आहे. दरम्यान, वडाळ्यात विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
हवामान खात्याने आगामी 24 तासातच कोकण-मुंबईत जोरदार पाऊस कोसळेल असा अंदाज दिला आहे. त्यामुळेच मुंबईत संभाव्य परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी नौदलाला हायअलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे लष्कराचे नौदल मुंबईकरांना मदत करताना दिसू शकते. मुंबईतील समुद्र किना-यावर ठिकठिकाणी नौदलाची पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच सी किंग हेलिकॉप्टरही प्रसंगी मदतीला धावणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला नियोजित जळगाव दौरा रद्द करून मुंबईत थांबणे पसंत केले आहे. आज दुपारी 12 च्या सुमारास फडणवीस यांनी मुख्य सचिव व मुंबई महापालिकेचे अध्यक्ष अजेय मेहता यांच्यासमवेत पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट दिली. फडणवीस यांनी या विभागाला व प्रशासनाला संभाव्य धोक्याची कल्पना दिली असून, त्याबाबत सूचना केल्या आहेत.
क्लिवलॅंड पंपिंग स्टेशनमध्ये दगड घुसल्याने दरवाजे बंद होत नाहीयेत. त्यामुळे हायटाईड (समुद्राची भरती)मुळे मुंबई किना-यावर पाणी घुसण्याची शक्यता आहे. पंपिंग स्टेशनमध्ये दगड घुसल्याने हे दरवाजे लागत नसल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे म्हणणे आहे. गेल्या दोन तासापासून पालिका अधिकारी यावर काम करीत आहेत. मात्र, अद्याप यश मिळाले नाहीये. त्या ठिकाणी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे जातीने उपस्थित आहेत. दरम्यान, पाण्याचा निचरा करण्यासाठी उभारण्यात आलेले दोन्ही पंपिंग स्टेशन्स अयशस्वी ठरल्याची माहिती पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. तसेच या प्रकल्पाच्या सल्लागारांच्या चौकशीचे आदेश देसाई यांनी काढले आहेत.
पुढे आणखी पाहा आणि वाचा... या संबंधित माहिती...
बातम्या आणखी आहेत...