आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत रेल्वे वाहतूक विस्कळीत; प्रवाशांकडून जाळपोळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कल्याण-ठाकुर्ली दरम्यान पेंटोग्राफ तुटल्याने शुक्रवारी सकाळपासूनच मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे दिवा रेल्वेस्थानकावरील हजारो चाकरमानी प्रवाशी स्थानकातच अडकून पडले. या संतप्त प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवर उतरून दगडफेक, जाळपोळ केली. त्यात एक मोटारमन जखमी झाला. त्यामुळे मोटारमनच्या युनियननेही आंदोलनात उडी घेतल्याने मध्य रेल्वेची संपूर्ण वाहतूकच कोसळली. सुमारे सहा तास चाललेला हा गोंधळ रोखण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.

या सर्व प्रकरणानंतर जागे झालेल्या रेल्वे प्रशासनाने ठाणे, कर्जत, कसारा रेल्वे मार्गावरील समस्यांसंदर्भात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत जानेवारीला ठाण्या बैठक आयोजित केली आहे. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास हा गोंधळ सुरू झाला. दिवा स्थानकात जलद गाड्या थांबत नव्हत्या आणि धिम्या गाड्यांचाही पत्ता नसल्याने प्रवाशांची सहनशीलता संपली आणि त्यांनी ट्रॅकवर उतरून चारही मार्ग रोखून धरले. प्रवासी एवढे हिंसक झाले की होती की बर्‍याच वेळाने आलेली एक गाडी रोखून त्यांनी त्यावर दगडफेक सुरू केली. जाळपोळही सुरू झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करताच परिस्थिती आणखी चिघळली.

जमावाने पोलिसांची व्हॅनही पेटवून दिली. घटनेची माहिती कळताच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. शेवटी सहा तासांनी आंदोलन निवळले. त्यानंतर दुपारी पावणेएक वाजता सीएसटीच्या दिशेने पहिली लोकल रवाना झाली.

जादा बसेससाठी सेल
शुक्रवारीमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांनी हिंसक आंदोलन केले. अशा आणीबाणीच्या वेळी प्रवाशांना इच्छित स्थळी जाता यावे यासाठी ज्यादा एसटी बसेस सोडता याव्यात यासाठी महामंडळाचा एक विशेष सेल स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. शुक्रवारी रेल्वे वाहतूक विस्कळीत होताच दिवा येथून ठाण्यापर्यंत ७० एसटी बसेस सोडण्याची व्यवस्था केली होती.

मोटार युनियनचे काम बंद
मोटरमनआर.के.चावडा हे दगडफेकीत जखमी झाले. त्यामुळे मोटरमन युनियनने काम बंद केले. याचा परिणाम हार्बर रेल्वेवर होऊन प्रवाशांचे आणखी हाल झाले. लोकांना ट्रॅकवरून चालत जाण्याची वेळ आली. रेल्वे व्यवस्थापनाने मोटारमनला सुरक्षेची हमी दिली खरी, पण ते कामावर परतल्यानंतर अर्ध्या तासातच सुरक्षा काढून घेण्यात आली. लोकल सुरळीत चालवायची असेल तर मोटरमनला सुरक्षा देणे गरजेचे आहे, असे युनियनचे म्हणणे आहे.