आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Cops Conduct \'crude, Degrading\' Finger Test On Rape Victim

मुंबईतील बलात्कार पीडित मुलीची केली अपमानजनक व क्रुर अशी \'टू फिंगर टेस्ट\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आजच्या आधुनिक काळातही मुंबई पोलिस एखाद्या स्त्रीवर बलात्कार झाल्याची खात्री करण्यासाठी जुनी व वादग्रस्त पद्धत अवलंबत असल्याचे एका मुलीच्या तक्रारीवरून पुढे आले आहे. सरकारच्या स्पष्ट आदेशानंतरही मुंबई पोलिसांनी एका मुलीवर बलात्कार झालेल्याची खात्री करण्यासाठी व तपासणीसाठी सरकारी रूग्णालय जेजेमध्ये 'टू फिंगर टेस्ट' करण्यात आली. बलात्कार पीडित मुलीवर ही घटना 31 जुलै रोजी शक्ति मिल कंपाउंडमध्ये ही घटना घडली होती. मात्र, 19 वर्षीय मुलीने या बलात्काराबात जाहीर वाच्यता केली नव्हती. संबंधित मुलीने 3 सप्टेंबर रोजी मुंबईत त्यात जागेवर एका महिला पत्रकारावर सामूहिक बलात्कार झाल्यानंतर ही घटना सांगितली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तिची मेडिकल तपासणी करण्यासाठी 'टू फिंगर टेस्ट' चा अवलंब केला होता.
बलात्काराची खात्री करण्यासाठी किंवा त्याला पुष्ठी देण्यासाठी मुंबई पोलिसांकडून आजही क्रूर, जुनाट व अपमानजनक 'टू फिंगर टेस्ट'चा वापर केला जात आहे. याबाबतचा खुलासा मंगळवारी तेव्हा झाला जेव्हा या प्रकरणी मुंबई पोलिसच्या गुन्हे शाखा विभागाने चार्जशीट दाखल केली. या चार्जशीट सोबत संबंधित मुलीचा जेजे रूग्णालयातील मेडिकल रिपोर्ट जोडण्यात आला आहे. ज्यात म्हटले गेले आहे की, 'टू फिंगर टेस्ट'नंतर संबंधित मुलीवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट होत आहे.
याबाबत रूग्णालयाचे डीन तात्यासाहेब लहाने यांचे म्हणणे आहे की, रूग्णालयात नवी पद्धतीचा अवलंब मागील मार्च महिन्यापासून सुरु करण्यात आला आहे. जेव्हा त्यांना जेजे चा मेडिकल रिपोर्ट दाखवला गेला त्यावर त्यांनी सांगितले की, मी हा रिपोर्ट पाहिला नाही आणि ज्या डॉक्टरने ही टेस्ट केली असेल तोच याचे उत्तर देईल.
या वर्षी 10 मेला राज्य सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले होते की, ही प्रक्रिया (टू फिंगर टेस्ट) अपमानजनक, क्रूर आणि वैज्ञानिक दृष्ट्या अयोग्य आहे. जुन्या शरीरसंबंधाचा ताज्या प्रकरणाशी काहीही देणे-घेणे राहत नाही.
पुढे वाचा, फिंगर टेस्ट वादग्रस्त का ? आणि काय आहे नवी व शास्त्रोक्त पद्धत....