आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांनी केली युवक-युवतीला जबर मारहाण, पाहा VIDEO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शहरातील अंधेरी पोलिसांनी एका युगुलाला पोलिस ठाण्‍यातच जबर मारहाण केली. हा प्रकार मंगळवारी रात्री 12 वाजताच्‍या सुमारास घडला. या घटनेचा व्‍हिडिओसुद्धा समोर आला आहे. त्‍यामुळे रक्षणकर्त्‍या पोलिसांनी केलेल्‍या क्रुर कायदेभंगावर आता वरिष्‍ठ अधिकारी काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे.

काय आहे प्रकरण ?
पीडित युवक-युवती हे एका ख्‍यातनाम आयटी कंपनीच्‍या कॉल सेंटरमध्‍ये काम करतात. मंगळवारी रात्री काम संपवून 12 वाजताच्‍या सुमारास ते घरी जाण्‍यासाठी मेट्रो स्‍टेशनकडे निघाले. मात्र, वाटेतच दोघांचे भांडण झाले. ड्यूटीवर असलेल्‍या दोन पोलिसांना ते भांडताना दिसले. त्‍यांनी त्‍यांना पोलिस ठाण्‍यात नेले. तिथे पोलिसांनी त्‍यांच्‍यासोबत आरेरावी केली. दरम्‍यान, मुलीने सांगितले की, आपले नातेवाईक संसदेत नौकरीला आहेत. त्‍यामुळे सोडून द्या, हे ऐकून पोलिसांच्‍या रागाचा पारा चढला आणि पाच ते सहा पोलिसांनी रिंगण करून दोघांनाही बेदम मारहाण केली.
काय आहे व्‍ह‍िडिओमध्‍ये ?
पोलिस जेव्‍हा या दोघांना मारहाण करत होती तेव्‍हा तिथे उपस्‍थित असलेल्‍या एका सामाजिक कार्यकर्त्‍याने आपल्‍या स्‍मार्ट फोनमध्‍ये याचे चित्रण केले. आम्‍हाला मारू नका, असे ही तरुणी जिवाच्‍या अकांताने सांगत होती. मात्र, पोलिस ऐकायला तयार नव्‍हते. नंतर युवक-युवतीच्‍या तोंडातून रक्‍त यायला लागले.
पोलिसांनाच अभयच
या प्रकाराचे चित्रिकरण 'सार्वजानिक एकता विकास आगमन' या संस्‍थेचे सामाजिक कार्यकर्ते गुलाम मकबूल शेख यांनी केले. एवढेच नाही तर त्‍यांनी या बाबत वरिष्‍ठ अधिकाऱ्यांकडे रीतसर तक्रार केली. मात्र, त्यांच्याकडून आपल्‍या कर्मचाऱ्यांना वाचवण्‍याचा प्रयत्‍न केला जात आहे. एवढेच नाही तर अंधेरीचे डीसीपी यांनी मारहाण करणाऱ्या पोलिसांना क्लीनचिटही दिली आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...