आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Corporation 'notice To AAP, Latest News Divya Marathi

‘आप’ला मुंबई पालिकेची नोटीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई-आम आदमी पार्टीने बुधवारी मुंबईत सभा घेऊन प्रचाराला सुरुवात केली. मात्र, मैदानाची परवानगी घेताना शिवजयंतीचे कारण नमूद करून प्रत्यक्षात राजकीय सभेचे आयोजन केले. त्यामुळे मुंबई महापालिकेने ‘आप’ची अनामत रक्कम जप्त केली असून नोटीसही बजावली आहे.
मुंबईत बुधवारी आपने पक्षाचे मार्गदर्शक योगेंद्र यादव यांच्या उपस्थितीत राज्यातील प्रचाराचा शुभारंभ केला. या सभेसाठी अंधेरीमधील मैदान निवडले. मुंबई पालिकेच्या मालकीच्या या मैदानाची परवानगी घेताना आपने शिवजयंतीचे कारण नमूद केले होते. खेळाचे मैदान कोणत्याही राजकीय कारणासांठी वापरता येत नाही. त्यामुळे ‘आप’ला सभेसाठी अंधेरीचे मैदान मिळणे शक्य नव्हते. हे मैदान उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात असून येथून राज्यातील प्रमुख नेते मयंक गांधी उभे आहेत. त्यामुळे ‘आप’ला याच मैदानावर सभा घ्यायची होती. सभेच्या दिवशी असल्याने शिवजयंतीचे कारण दाखवून पक्षाने मैदानाची परवानागी काढली. सभेत शिवाजी महाराजांचा पुतळाही ठेवला गेला. तसेच ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणाही देण्यात आल्या.
सभा झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी मुंबई पालिका प्रशासनाला फसवणूक झाल्याचे कळून आले. मैदान ज्या भागात येते त्या वॉर्डच्या सहायक आयुक्ताने ‘आप’वर कारवाईचा बडगा उगारला. मैदानाच्या परवानगीवेळी भरलेली 2200 रुपयांची अनामत जप्त करण्यात आली तसेच ‘आप’ला नोटीसही बजावण्यात आली.
त्यामुळे प्रचाराच्या शुभारंभाची सभा वादात सापडली असून ‘आप’ने विरोधकांच्या हातात आयतेच कोलीत दिले आहे.