आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Court Orders Fresh Trial In Salman Khan Hit and run Case

हिट अँड रन प्रकरण : खटला नव्याने चालणार, सलमानला मोठा दिलासा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूडचा अभिनेता सलमान खानला हिट अँड रन प्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 11 वर्षापासून सुरु असलेल्या या खटल्याची सुनावणी नव्याने करण्याची सलमानच्या वकिलाची मागणी वांद्रे सेशन कोर्टाने मान्य केली आहे. त्यामुळे या प्रकरणी 23 डिसेंबरपासून नव्याने खटला चालेल व नव्याने सर्व सुनावणी घेतल्या जाणार आहेत. 2002 साली सलमान खानने आपल्या गाडीने मुंबईतील कार्ट रोडवर रस्त्यावरील पाच जणांना रात्रीच्या वेळी बेफीकारपणे गाडी चालवून चिरडले होते. यात एकाचा मृत्यू झाला होता. तर, काही जणांना कायमचे अंपगत्व आले होते.
दरम्यान, गेल्या 11 वर्षापासून या खटल्याबाबत घेतलेल्या सुनावण्या, चौकशा व पुरावे निष्फळ ठरणार आहेत. त्यामुळे 23 डिसेंबरपासून नव्याने सुरु होणा-या या खटल्याप्रकरणी साक्षीदार पुन्हा कबुलीजबाब नोंदवतील. तसेच पुरावे सादर करतील. तसेच नव्याने सादर झालेले पुरावे व साक्षीदारांच्या जबाबीवर खटल्याची दिशा ठरेल. यामुळे या घटनेतील काही साक्षीदार विविध कारणामुळे साक्षीला येऊ शकतील की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळेच वांद्रे सेशन कोर्टाने सलमान खानला दिलेला दिलासा खूपच महत्त्वाचा ठरणार आहे.