आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई पोलिस आयुक्त जावेद अहमद भारताचे सौदीतील राजदुत, घेतात केवळ 1 रुपया पगार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईचे पोलिस आयुक्त जावेद अहमद यांची सौदी अरेबियातील भारताचे राजदुत म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शिफारस केली होती. मोदींनी अनुकूलता दर्शविल्यानंतर सौदी सरकारला जावेद यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. सौदीने हिरवा कंदील दाखविल्यानंतर याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. जावेद अहमद उत्तर प्रदेशातील श्रीमंत नवाब असून गेल्या 35 वर्षांपासून केवळ 1 रुपया पगार घेतात.
हाय प्रोफाइल शीना बोरा हत्‍याकांडाचे तपास अधिकारी तथा मुंबईचे माजी पोलिस आयुक्‍त राकेश मारिया यांची उचलबांगडी झाल्यानंतर जावेद अहमद यांची पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. राज्‍य शासनाने बढती देत मारिया यांना होमगार्डचे महासंचालक केले होते. त्यापूर्वी अहमद जावेद हे होमगार्ड पोलिस महासंचालक होते. त्यांना मुंबईचे पोलिस आयुक्त करण्यापूर्वी या पदाचा दर्जाही वाढविण्यात आला होता. 1980 च्‍या आयपीएस बॅचचे अधिकारी जावेद जानेवारी 2016 मध्ये होणार आहेत.
पुढील स्लाईडवर वाचा....महिलांसाठीच्‍या हेल्‍पलाइनचे जनक?.... उत्‍तर प्रदेशातील नबाब.... घेतात एक रुपया पगार.... घालतात खादीचा गणवेश....वापरतात खासगी कार.....
बातम्या आणखी आहेत...