आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Cricket Association Election Ramdas Athawale Application Rejected

एमसीए प्रशासन जातियवादी, क्लब विरोधात रिपाइंचे बंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) निवडणुकीत मी उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, कोणतेही कारण न देता तो फेटाळण्यात आला असून क्लबच्या या मनमानी निर्णयाचा निषेध करण्यासाठी निवडणुकीच्या दिवशी रिपाइं कार्यकर्ते तीव्र निदर्शने करणार असल्याची माहिती रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी शनिवारी पत्रकारांना दिली.
18 ऑक्टोबर रोजी एमसीएची निवडणूक होत आहे. केवळ मुंबईचे नाही तर पूर्ण राज्याचे लक्ष एमसीएच्या निवडणुकीकडे लागले आहे. आठवले एमसीए क्लबचे सदस्य नाहीत. मात्र, ते अध्यक्ष असलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीला निवडणुकीत 3 मतांचा अधिकार आहे. सोसायटीने यंदा मला मताचा अधिकार दिल्याचे पत्र त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवले.

आरक्षण लागू करावे
क्लबच्या कार्यकारिणीत मनमानी कारभार सुरू आहे. स्वच्छ यंत्रणेसाठी येथे सर्व विभागांत आरक्षण लागू करण्यात यावे, अशी मागणीही आठवले यांनी या वेळी बोलताना केली.

क्लबचे प्रशासन जातीयवादी
क्लबच्या या मनमानीविरोधात आम्ही न्यायालयात जाणार असून निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी करणार आहोत. क्लबचे प्रशासन जातीयवादी असून त्याचा निषेध करण्यासाठी निवडणुकीच्या दिवशी म्हणजे 18 ऑक्टोबर रोजी रिपाइं कार्यकर्ते वानखेडे स्टेडियमबाहेर तीव्र निदर्शने करणार आहेत.’’
रामदास आठवले, रिपाइं, अध्यक्ष