आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mumbai Crime Branch Seeks To Confront Abu Jundal With Kasab ‎

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कसाब-जबीला समोरासमोर आणण्याचे प्रयत्न

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबईवर झालेल्या 2६/11 च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये एकमेव जिवंत पकडण्यात आलेला अतिरेकी अजमल कसाब आणि या हल्ल्याचा मास्टर माइंड जबीउद्दीन अन्सारी ऊर्फ अबु जिंदाल या दोघांना चौकशीसाठी एकमेकांसमोर आणण्याची मुंबई पोलिस योजना आखत आहे.
यासाठी मुंबई पोलिसांनी गेल्या आठवड्यात राज्य सरकारकडे परवानगी मागितली आहे. मात्र, राज्य सरकारकडून अद्याप पोलिसांना काहीही उत्तर मिळाले नाही. मुंबईवर हल्ला होण्याआधी अतिरेकी डेव्हिड हेडली आणि इतर आपण भेटल्याचे जबीने मुंबई पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितले आहे. डेव्हिड हेडली सध्या अमेरिकेच्या ताब्यात आहे. त्यामुळे जबी खरे सांगत आहे की नाही हे तपासण्यासाठी मुंबई पोलिस या दोघांना समोरासमोर आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
ज्यावेळी 2६/11 रोजी अतिरेकी मुंबईवर हल्ला करत होते. त्यावेळी लष्कर-ए तोयबाच्या पाकिस्तानातील कराची येथील केलेल्या कंट्रोल रुममध्ये मी तिथेच होतो असे जबीने चौकशीदरम्यान सांगितले आहे. तसेच मुंबईतील छाबाड हाऊस या प्रार्थनास्थळामध्ये घुसलेल्या अतिरेक्यांशी बोलत असल्याचे जबीने पोलिसांना सांगितले आहे. मूळ मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेला जबीला सौदी अरेबिया येथून अटक करण्यात आली. त्यानंतर त्याचे भारताकडे प्रत्यार्पण करून 21 जुलै रोजी मुंबई पोलिसांना त्याचा ताबा देण्यात आला. तसेच जबी हा 13 ऑगस्टपर्यंत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या ताब्यात राहणार आहे.
कसाब म्हणतो, मुंबईवरील 26/11चा कट पाकमध्येच