आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत तीन पत्रकारांवर हल्ला, एकाचा मृत्यू, बार मालकांवर संशय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल फोटो)
मुंबई- मुंबईतील मीरा-भाईंदरमध्ये गुरुवारी रात्री तीन पत्रकारांवर हल्ला झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. यात एका पत्रकाराचा मृत्यू झाला आहे, तर दोघे जखमी झाले आहेत. हे तीनही पत्रकार काल रात्री पोलिसांनी छापा मारलेल्या बारचे वार्तांकन करण्यासाठी गेले होते. गुरुवारी सकाळीच एका वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराला मुंबईत मारहाण करण्यात आली होती. त्याचसोबत कॅमे-याची तोडफोड करून कॅमेरामनलाही मारहाण झाली होती. 24 तासांत 5-6 पत्रकारांवर मुंबईसारख्या महानगरात हल्ला झाल्याने राज्यात कायदा व सुव्यवस्था नावाची गोष्ट राहिली आहे काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
राघवेंद्र दुबे असे मृत्यू झालेल्या पत्रकाराचे नाव असून, ते मीरा-भाईंदरमधील एका साप्ताहिकाचे संपादक होते. तर, शशी शर्मा आणि संतोष मिश्रा हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रूग्णलयात उपचार सुरू आहेत.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री मीरा-भाईंदरमध्ये पोलिसांनी एका बारवर छापा टाकला. बारवर टाकलेल्या धाडीची बातमी कव्हर करण्यासाठी पत्रकार तेथे गेले होते. रात्री 1 वाजता पोलिसांनी मीरा भाईंदर रोडवरील व्हाइट हाऊस बिअर बारवर टाकलेल्या धाडीत 15 मुलींना ताब्यात घेतले होते. यावेळी घटना स्थळी शशी शर्मा आणि संतोष मिश्रा वार्तांकनासाठी हजर होते. त्यावेळी त्यांच्यावर अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर या दोघांवर हल्ला केल्याबद्दल तक्रार दाखल करण्यासाठी राघवेंद्र दुबे हे मीरा रोड पोलिस ठाण्यात गेले होते. त्यावेळी तेथे अनेक बार मालक उपस्थित होते. त्यावेळी पोलिस, बारमालक आणि दुबे यांच्यात बाचाबाची झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर पहाटे पाचच्या सुमारास दुबे यांचा मृतदेह एस. के. स्टोन चौकीजवळ ठिकाणी आढळून आला. त्यावेळी दुबे यांच्या डोक्याला मार लागल्याचे दिसून आले. या घटनेत बारमालकांचा सहभाग असावा असे प्रथमदर्शिनी दिसत आहे. पोलिसांत तक्रार दाखल झाली असून, पोलिस पुढील तपास करीत आहेत.
महिला पत्रकार मारहाणप्रकरणी तिघांना अटक- सांताक्रुझमध्ये सिलेंडर स्फोटाचे वार्तांतन करण्यासाठी गेलेल्या एका महिला पत्रकार व कॅमेरामनला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली आहे. अय्याज, सलमान शेख यांच्यानंतर कय्यूमच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...