आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई : घरात डांबून 17 वर्षीय तरूणीवर सहा महिन्यांपासून बलात्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील कल्याण-शिळ मार्गावरील दावडी गावात एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलींवर घरात डांबून गेली सहा महिने बलात्कार होत असल्याची घटना पुढे आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी बलात्कार करणा-या तरूणाच्या आई-वडिलांना अटक केली आहे. बलात्कार करणारा तरूण सध्या फरार आहे.
याबाबतची माहिती अशी अशी, कल्याण-शिळ मार्गावर टाटा पॉवर परिसरात राहणा-या संबंधित 17 वर्षीय मुलीस सुबोध भडवलकर (23) याने लग्नाचे आमिष दाखवून पळवून आपल्या दावडी येथील घरी नेले. सुबोधने व त्याचा आई-वडिलांनी या तरूणीस घरात डांबून ठेवले तसेच बाहेर कोठेही जाण्यास मनाई केली. या काळात सुबोध तिच्यावर अत्याचार करत होता.
दरम्यान, ही बाब मुलीच्या भावाला कळल्यानंतर त्याने पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी सोमवारी रात्री सुटकी केली. मात्र घरी सुबोध नव्हता. पोलिसांनी सुबोधच्या आई-वडिलांना तत्काळ अटक केली. याची माहिती मिळताच सुबोध फरार झाला. मात्र, हे प्रेमप्रकरणाचे प्रकरण असल्याने पोलिसांनी मुलीची चौकशी केली. तिने सांगितले की, शरीरसंबंध ठेवल्यानंतर काही दिवसानंतरच सुबोधने लग्न करण्यास नकार दिला होता.
(संग्रहित छायाचित्र)
पुढे वाचा, सहकारी महिला डॉक्टरवर बलात्कार केल्याप्रकरणी माजी वैद्यकीय अधिकरी अटकेत