आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई, ठाण्यात तिहेरी हत्याकांडाच्या दाेन घटना, कारण अस्पष्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/ ठाणे - मुंबईतील मालाड उपविभाग आणि ठाणे जिल्ह्यातील कारवले गावात तिहेरी हत्याकांडाच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्याचे गुरुवारी उघडकीस अाले अाहे. या दाेन्ही घटनांत एकाच कुटुंबातील प्रत्येकी तिघांचा म्हणजे एकूण सहा जणांचा खून करण्यात अाला अाहे.

मालाडच्या मालवणी परिसरामध्ये आजीसह दोन नातवांची अज्ञात व्यक्तीने बुधवारी मध्यरात्री धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केली.

बाबली शॉ (४७), आर्यन इस्माईल शेख (१३) आणि सायना इस्माईल शेख (८) अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व जण मूळ बंगळुरूचे रहिवासी आहेत. दरम्यान, या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. तर ठाणे जिल्ह्यातील कारवले गावात एकाच कुटुंबातील तिघांची अज्ञाताने कुऱ्हाडीने हत्या केल्याचे गुरुवारी उघडकीस आले. शंकर नामदेव भंडारी (६०), फसूबाई शंकर भंडारी (५२) आणि सनी भंडारी (२२) अशी मृतांची नावे आहेत. घटना घडली त्या वेळी कुटुंबातील दोन जण बाहेर गेले होते, त्यामुळे ते बचावले. गुरुवारी सकाळी भंडारी कुटुंबातील कोणीही बाहेर न आल्याने शेजाऱ्यांनी घरात जाऊन पाहिले असता हत्याकांड उघडकीस अाले.
बातम्या आणखी आहेत...