आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई- मुलुंडमध्ये चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करुन हत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील मुलुंडमध्ये एका 7 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या करण्‍यात आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.

शनिवारी रात्री चिमुरडी घराबाहेर खेळत होती. ती अचानक गायब झाल्‍याने पालकांनी उशीरापर्यंत तिचा शोध घेतला. अखेर परिसरात पार्क केलेल्या एका ट्रकच्‍या खाली चिमुरडी सापडली ती बेशुद्धावस्थेत होती. तिला सावरकर हॉस्‍पिटलमध्‍ये हलवण्‍यात आले, मात्र डॉक्‍टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे नवघर पोलिस या प्रकरणातील आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे अल्‍पवयीन मुलींच्‍या सुरक्षेचा मुद्दा पुन ऐरणीवर आला आहे.
बातम्या आणखी आहेत...