आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डबेवाले करणार डेंग्यू, मलेरियाविषयी जनजागृती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - डेंग्यू आणि मलेरियासारख्या रोगांचा निपटारा करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) मुंबईत डबेवाल्यांची मदत घेणार आहे. डबेवाले रोज जे डबे पोहोचवतात त्यांच्यावर डब्ल्यूएचओने खास तयार केलेले टॅग लावले जातील. या टॅगच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
मुंबईत सुमारे पाच हजार डबेवाले दररोज 2 लाखांवर मुंबईकर कर्मचार्‍यांना डबे पोहोचवतात. त्यावर लावलेल्या टॅगवरील सूचनांच्या मदतीने या रोगांविषयी माहिती दिली जाईल. त्यामुळे या माध्यमातून मुंबईकरांमध्ये अधिकाधिक जनजागृती निर्माण करणे शक्य होणार असल्याचे नूतन मुंबई डबा पुरवठादार ट्रस्टचे माजी अध्यक्ष रघुनाथ मेडगे यांनी सांगितले. डबेवाले सगळ्यांना आग्रह करून डब्यांवरील संदेश वाचायला सांगत असल्याचेही ते म्हणाले. सर्व मुंबईकरांना आपल्या जिवाची काळजी असते.
रुग्णालये आणि डॉक्टरांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणावर वाढ होत असली, तरी त्याच पटीमध्ये रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. त्यांच्या उपचारांसाठी हजारो रुपये खर्च होतात. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्यासाठी नागरिकांनी या सूचनांचे पालन करावे, असे ते म्हणाले. भारतामध्ये डेंग्यू, मलेरियासारख्या रोगांपासून निर्माण होणार्‍या धोक्याचे प्रमाण फार अधिक आहे. त्यापासून निपटारा करण्यामध्ये विविध संस्थांमध्ये असलेल्या समन्वयाचा अभाव, विविध प्रशासकीय यंत्रणा, योजना राबवणार्‍या संस्था ही आव्हाने असल्याचे डब्ल्यूएचओच्या भारताच्या प्रतिनिधी नाटा मेनाबे यांनी सांगितले.