आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रसायनांच्या टँकरचा स्फोट, दोन जण ठार, तीन जण गंभीर जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे | मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रसायन वाहून नेणाऱ्या एका टँकरला भीषण अपघात होऊन स्फोट झाला. यात दोन जण ठार तर तिघे जखमी झाले. शिवाय, या स्फोटाच्या तावडीत सापडल्याने तीन वाहनेही जळून गेली. पालघर जिल्ह्यातील वडोळी गावातील पेट्रोलपंपाजवळ ही घटना घडली. येथील तहसिलदार विशाल दौंडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमुळे महामार्गावरील वाहतुक मोठ्या प्रमाणात खोळंबली असून ती सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रमेश खोत आणि रज्जाक बापू गावड अशी मृतांची नावे असून ते या ट्रकमधूनच प्रवास करत होते. शिवाय, एका कारमधून प्रवास करत असलेले अजिंक्य पाटील, प्राची पाटील आणि रसिका पाटील यात जखमी झाले आहेत.
बातम्या आणखी आहेत...