आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Darshan: MTDC Launched Heli tourism In Partnership With PawanHans

आजपासून मुंबापुरीची सफर हेलिकॉप्टरने, ‘हेलि-टुरिझम’चे दिमाखात लाँचिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेलिकॉप्टरमधून मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकचे टिपलेले छायाचित्र - Divya Marathi
हेलिकॉप्टरमधून मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकचे टिपलेले छायाचित्र
मुंबई- 24 तास धावणा-या मुंबईचे दर्शन आता तुम्हा-आम्हाला हवाई सफरीतून घेता येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि पवनहंस लिमिटेडच्या वतीने आजपासून ‘हेलि-टुरिझम’चे लाँचिंग करण्यात आले. राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ झाला. आज दुपारी तीन वाजल्यापासून पर्यटकांना ही सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. देश-विदेशातून मुंबई भेटीवर येणा-या पर्यटकांना निळाशार समुद्रकिनारी वसलेल्या मुंबापुरीचे दर्शन हवाई सफरीतून घेता येणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई दर्शन घेता येईल तर दुस-या टप्प्यात एलिफंटा बेट, अजिंठा-वेरुळ लेणी आणि शिर्डी या ठिकाणी हेलिकॉप्टर रपेट मारता येणार आहे.
जुहू एअरोड्रोमवरून टेकऑफ घेतील हेलिकॉप्टर्स-
- या सफरीसाठी दररोज जुहू एअरोड्रोमवरून ही हेलिकॉप्टर्स टेकऑफ घेतील
- हेलिकॉप्टर सफरीमध्ये सध्या दोन पॅकेजेस उपलब्ध. यात दक्षिण मुंबई व उत्तर मुंबई असे भाग पाडले आहेत.
- दक्षिण मुंबईची सफर दर मंगळवारी व शुक्रवारी करता येईल. यात जुहू, वांद्रा-वरळी सी लिंक, हाजी अली अशी आदींचे दर्शन घडेल.
- उत्तर मुंबईची सफर दर सोमवारी व शनिवारी करता येईल. यात जुहू, वर्सोवा, मालाड, गोराई आणि एस्सेल वर्ल्डपर्यंतची मुंबई पाहता येईल.
- पर्यटकांचा प्रतिसाद पाहून फेरींच्या संख्या वाढविण्याचा पर्यटन विभागाचा मानस आहे.
- गेल्या वर्षी ‘मुंबई दर्शन बाय एअर’ नावाची सेवा सुरू झाल्यानंतर आता हेलिकॉप्टर सेवा सुरु झाल्याने आता पर्यटकांना मुंबईचे विहंगम दृश्य न्याहळता येणार आहे.

10 मिनिटांसाठी मोजावे लागतील 3200 रूपये-
- आयआरसीटीसीतर्फे सुरू करण्यात आलेल्या या अस्विमरणीय हवाई सफारीचा आनंद घेण्यासाठी प्रत्येक पर्यटकाला 10 मिनिटांसाठी 3200 रूपये मोजावे लागतील.
- एका हेलिकॉप्टरमध्ये पायलट वगळता केवळ चार व सहा पर्यटकांनाच बसता येईल. 15 मिनिटांची सफर करायची असेल तर प्रत्येकी 5580 रूपये द्यावे लागतील.
- एखाद्या जोडप्याने बुकिंग केले आणि त्यांच्याकडे दोन वर्षांपेक्षा लहान मुलगा असेल तर त्याला शुल्क माफ.
- हेलिकॉप्टर राईड करताना प्रत्येक पर्यटकाला आपले ओळखपत्र दाखवणे बंधनकारक आहे.
- या हेलि-टूर्सचे बुकिंग एमटीडीसीच्या सर्व कार्यालयांमध्ये आणि रिझर्व्हेशन सेंटरमध्ये सुरू असणार आहे. पर्यटक एमटीडीसीच्या वेबसाईटवरूनही संपर्क करू शकतात.
पुढे पाहा, या संबंधित छायाचित्रे...