आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्मादाय कार्यालयाकडे 250 कोटी रुपये पडून

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे 251 कोटी रुपये अनेक वर्षांपासून पडून आहेत. हे पैसे खर्च केल्याशिवाय अंशदानाची रक्कम स्वीकारण्यास न्यायालयाने धर्मादाय आयुक्तालयाला स्थगिती दिली आहे. परंतु हा पैसा कुठे खर्च करायचा, असा प्रश्न विधी व न्याय विभागाला पडला आहे.
धर्मादाय आयुक्तालय 25 हजार रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या संस्थांकडून अंशदानापोटी दोन टक्के रक्कम जमा करते. धर्मादाय आयुक्तांकडे अशी 251 कोटी रुपयांची रक्कम पडून आहे. याबाबत एक जनहित याचिका नुकतीच दाखल करण्यात आली होती. त्या वेळी न्यायालयाने आयुक्तालयाला अंशदान घेण्यास स्थगिती दिली. जमा झालेला निधी कुठे खर्च करायचा, असा प्रश्न विधी व न्याय विभागाला पडला आहे खरा, परंतु आयुक्तालयांची स्थिती पाहता सर्वप्रथम याच कार्यालयाची दुरवस्था दूर करणे आवश्यक असल्याते मत याच विभागातील अधिकार्‍यांनी व्यक्त केले.

मुंबईतील वरळी येथे मुख्य धर्मादाय आयुक्त कार्यालय असून याच ठिकाणी मुंबई जिल्हा धर्मादाय कार्यालय आहे. तसेच राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालये आहेत. खरे तर जालना, चंद्र्रपूर, गडचिरोली, अलिबाग येथे जिल्हा धर्मादाय कार्यालये बांधण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. ही धर्मादाय कार्यालये लवकरात लवकर बांधली गेली तर त्याचा फायदा या विभागातील संस्थांना होणार आहे.