आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई महापालिकेतील नालेसफाई घोटाळा, अखेर पाच ठेकेदारांना अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई महानगरपालिकेत गेल्या वर्षी पावसाळ्यात नालेसफाई केल्याचे सांगून खोटी बिले काढत घोटाळा केल्याप्रकरणी पाच ठेकेदारांना आज अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली आहे.
आकाश इंजिनिअरिंग कन्सलटन्सचे राजु बिजलानी, डी. के एंटरप्रायजेसचे पुखराज जैन, हेमांग कंन्स्ट्रक्शनचे दिनेश शहा, इंदिरा कन्स्ट्रक्शनचे अरविंद जैन आणि एस. के एंटरप्रायजेसच्या कृष्णा पुरोहित अशी अटक केलेल्या पाच ठेकेदारांची नावे आहेत.
मुंबईतील विविध भागातील नाल्यातील गाळ काढण्याच्या कामात गैरव्यवहार केल्याचा या पाच ठेकेदारांवर आरोप आहे. गेल्या वर्षी पावसाळ्याआधी मे- जून महिन्यात मुंबई शहरातील ठिकठिकाणांवरील नाल्यातील गाळ काढण्याचे काम या ठेकेदारांना देण्यात आले होते. तसेच संपूर्ण नालेसफाई झाल्याचे सर्वांनी सांगत बिले काढून घेतली. मात्र, ऐन पावसाळ्यात मुंबई शहरात सर्वत्र पाणी तुंबल्याने नालेसफाईबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी हे प्रकरण लावून धरले. मुंबई महापालिका व विधानसभेतही यावर चर्चा झडली.
याप्रकरणाची सर्वत्र झाल्यानंतर बीएमसीचे आयुक्त अजय मेहता यांनी नालेसफाई घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या चौकशीत वरील ठेकेदारांनी काम नीट न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.