आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई महापालिकेत डावी लोकशाही आघाडी लढवणार 150 जागा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सर्व छोट्या मोठ्या पक्षांची मोट बांधून तयार करण्यात आलेल्या ‘रिडालोस’मधून रिपाइंबाहेर पडल्याने आता फक्त डावी लोकशाही आघाडीच स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत ही आघाडी 150 जागा लढवणार असल्याची माहिती जनता दलाचे (सेक्युलर) मुंबई प्रदेशाध्यक्ष प्रभाकर नारकर यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. नारकर म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना-भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी रिडालोसची स्थापना करण्यात आली होती. परंतु रिडालोसमधून रिपाइंचे नेते बाहर पडल्याने या निवडणुकीत ते आमच्यासोबत नाहीत. सीपीआय, सीपीएम, शेकाप, जनता दल आणि राष्ट्रीय समाज पक्षाची आम्ही डावी लोकशाही आघाडी तयार केली आहे. मुंबईतील बहुतेक विभागात आम्ही उमेदवार उभे करणार आहोत. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आम्ही पूर्ण केल्या असून 2-3 दिवसांतच आमच्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल.