आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Elephants Caves Profit To Get Drought Areas

‘एलिफंटा’चे उत्पन्न दुष्काळ निधीसाठी; छगन भुजबळ यांची घोषणा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईत सुरू असलेल्या एलिफंटा महोत्सवाच्या तिकीट विक्रीतून मिळालेले उत्पन्न मुख्यमंत्री दुष्काळ सहायता निधीसाठी दिले जाईल, अशी घोषणा राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी रात्री केली. मुंबईहून जवळच असलेल्या घारापुरी बेटांवर राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने आयोजित एलिफंटा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
केंद्रीय पर्यटन सचिव परवेज दिवाण, राज्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया, विभाग सचिव मेधा गाडगीळ, पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जगदीश पाटील, सहसंचालक सतीश सोनी, अभिनेता जॅकी श्रॉफ यांच्यासह देशी-विदेशी पर्यटक उपस्थित होते. महोत्सवाचा शुभारंभ श्वेता पंडित यांच्या गायनाने व उस्ताज सुजाद खान यांच्या सांगीतिक कार्यक्रमाने झाला. त्यानंतर पार्वती दत्ता व सहकार्यांनी विविध नृत्याविष्कार सादर केले.
महाराष्ट्रातील लेणी, गड, किल्ले, धार्मिक स्थळे, थंड हवेची ठिकाणे, निसर्गरम्य समुद्रकिनारे या सर्व गोष्टींसाठी एमटीडीसीमार्फत विविध उपाय योजण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. तर एलिफंटा महोत्सव फक्त राज्यच नाही तर देशाच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा असून त्यामुळे बरेच देशी व विदेशी पर्यटक या ठिकाणी आकर्षित होतील, असा विश्वास केंद्रीय पर्यटन सचिव दिवाण यांनी व्यक्त केला.