आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Estern FreeWay To Name By Dr. Babasaheb Ambedkar

'मुंबईत ईस्टर्न फ्री वेला डॉ.आंबेडकरांचे नाव द्या'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- चेंबूर ते यलो गेट ईस्टर्न फ्री वेच्या प्रकल्पाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना तसे पत्र पाठवले आहे. अणुशक्तिनगरातून जाणार्‍या या रस्त्यामुळे बहुतांश मागासवर्गीयांना विस्थापित व्हावे लागल्याचे मलिक यांचे म्हणणे आहे. दक्षिण मुंबईतील फोर्ट ते घाटकोपर एक्स्प्रेस हायवेला जोडणार्‍या या चौपदरी रस्त्याची उभारणी एमएमआरडीए करत आहे. 16.4 कि.मी.च्या विनासिग्नलच्या रस्त्यामुळे पश्चिम उपनगरे महानगराशी जोडली जाणार आहेत.
रस्त्याच्या कामात रहिवाशांनी अडथळा न आणता घरे दिली आहेत, असे मलिक यांनी म्हटले आहे. मलिक अणुशक्तिनगर भागाचे आमदार आहेत.