आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘हिट अँड रन'चा आरोपी अग्निशमन दलप्रमुख ?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबई अग्निशमन दलामागील शुक्लकाष्ट अद्यापही सुरूच आहे. काळबादेवी आग दुर्घटनेत चार अधिकार्‍यांच्या मृत्यूनंतर आता या दलासंदर्भात नवा वाद उभा राहिला आहे. प्रभात रहांगदळे यांची अग्निशमन दलाच्या प्रमुखपदी होऊ घातलेली नियुक्ती त्यांच्यावरील न्यायालयीन खटल्यामुळे वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे.

२१ डिसेंबर २००५ रोजी गोरेगाव परिसरात रहांगदळे यांच्याकडून अपघात घडला होता. या प्रकरणात ऑटोरिक्षाचालक जनाईप्रसाद रामबहादूर शर्मा यांचा मृत्यू झाला. रहांगदळे हे शर्मा यास जखमी अवस्थेत सोडून देत फरार झाले होते. पोलिसांनी १ एप्रिल २००६ रोजी रहांगदळे यांच्याविरोधात कलम ३०४ (अ) आणि १३४ (अ) (ब) मोटार वाहतूक कायद्याप्रमाणे दोषारोपपत्र दाखल केले. १ जुलै रोजी पुढील सुनावणी आहे.

वादग्रस्त व्यक्तीला जबाबदारीच्या पदावर नियुक्त करून महापालिका आणखी वाद ओढवून घेत आहे. बृहन्मुंबई महापालिकेचा वार्षिक अर्थसंकल्प ३४ हजार कोटी रुपयांचा आहे. अग्निशमन दलावर मोठा खर्च होत असतो. अग्निशमन दलाच्या अनेक निविदा यापूर्वी वादाच्या भोवर्‍यात सापडल्या आहेत. त्यामुळे या दलाचा प्रमुख नेमण्यात राजकीय पक्षांचा हस्तक्षेप असल्याचे समजते. त्याची प्रचिती सध्या पालिकेत येत आहे.
बातम्या आणखी आहेत...