आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईत फर्निचरची 80 दुकाने भस्मसात, 25 जण जखमी, अनेक झोपड्या जळून खाक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- जोगेश्वरीच्या घास कंपाउंड येथील फर्निचर दुकानांना शुक्रवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. आगीमध्ये एकंदर ऐंशी दुकाने भस्मसात झाली असून येथील व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. आगीत पंचवीस नागरिक जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर अाहे, अशी माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली.

पहिल्यांदा गॅरेजमध्ये आग लागली, त्यानंतर ती फर्निचरच्या दुकानांमध्ये पसरली. गॅरेजमधील सिलिंडरचे स्फोट होऊन आग आणखीनच भडकली. गॅरेजशेजारी प्लास्टिक कंपनी, गादीचे दुकाने आहेत. त्यामुळे आगीचे स्वरूप आणखी रौद्र झाले. आजूबाजूच्या झोपड्या, लाकडाची दुकाने, काचेची दुकाने, इलेक्ट्रिक दुकाने आगीत जळून खाक झाली. आगीमुळे आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील निवासी इमारती आणि शाळा रिकाम्या करण्यात आल्या होत्या.

लाकडाच्या वस्तू, प्लास्टिक, चिंध्यांचा साठा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे आग पसरल्याचे सांगण्यात येते. आगीची माहिती मिळताच वांद्रे, अंधेरी, कांदिवली, बोरिवली येथून अग्निशमन दलाचे बंब रवाना झाले. त्यानंतर आग आटोक्यात आली.
१५ फायर इंजिन, १० वॉटर टँकर व ५ रूग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. घास कंपाउंडमध्ये जाणारा रस्ता अरुंद अाहे, त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

आग विझवत असतानाच दहा सिलेंडरचे स्फोट झाल्याचे ऐकू आले.तरी दोन जिवंत सिलेंडर आगीमधून बाहेर काढण्यास अग्निशमन दलाला यश आले. सदर आग गॅरेज मध्ये वापरण्यात येणाऱ्या गॅस कटरच्या सिलेंडरचा स्फोट होवून लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, जोगेश्वरीत फर्निचर मार्केटमध्ये लागलेल्या आगीची भीषणता दर्शवणारे फोटो आणि व्हिडिओ...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...