आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई: 22 तासांच्या भव्य मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचे गिरगाव चौपाटीवर थाटात विसर्जन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 'गणपती बाप्पा मोरयाऽऽऽ पुढच्या वर्षी लवकर याऽऽऽ, च्या जयघोषात मुंबई, पुण्यासह राज्यभरातील सार्वजनिक गणपतींन निरोप देणयात आला. 22 तासांच्या मिरवणुकीनंतर आज सकाळी गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाला थाटात निरोप देण्यात आला..
 
दरम्यान, घाटकोपर येथील सिध्दार्थनगरमध्ये मिरवणुकीत फटाक्याच्या धुराने डोळ्यांना त्रास झाल्याने 50 हून अधिक जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या डोळ्यामध्ये जळजळ होत असल्याने त्यांना उपचारासाठी हलवण्यात आले आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरच्या गणपतीचे शासकीय निवासस्थानातील कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. पत्नी अमृता आणि कन्येच्या हस्ते भक्तीमय वातावरणात लाडक्या गणरायाचा निरोप दिला.

69 नैसर्गिक स्थळे तर 31 कृत्रिम तलावांत विसर्जनाची व्यवस्था...
मुंबईत शंभर ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्‍यात आली होती. त्यात 69 नैसर्गिक स्थळे तर 31 कृत्रिम तलावांचा समावेश आहे. विसर्जन स्थळावर जीवरक्षक, रुग्णवाहिका, प्रथमोपचार केंद्र, ध्वनिक्षेपक, मोटरबोट, स्वागत कक्ष, चौकशी व नियंत्रण कक्ष, स्टील प्लेट, तात्पुरते शौचालये, निर्माल्य कलश, निरीक्षण मनोरे, फ्लड लाईट, सर्च लाईट, डंपर, जर्मन तराफे, विद्युत व्यवस्था, मनुष्यबळ, हॅम रेडिओ, अग्निशमन दल सज्ज होते.

40 हजार पोलिस  तैनात...
मुंबईत पोलिस आणि महापालिकेकडून गणपती विसर्जनासाठी चौपाट्या सज्ज करण्यात आल्या होत्या. मुंबईत तब्बल 40 हजार पोलिस विसर्जन मिरवणुकीसाठी तैनात करण्यात आले होत्या. मुंबईत शंभर ठिकाणी गणेश विसर्जनाची सोय करण्यात आली होती. तसेच अनेक रस्त्यांची वाहतूक बंद ठेवण्यात आली, तर काही रस्त्यांवरची वाहतूक वळवण्यात आली होती.

मुंबईत 1,573 ‘सायलेन्स झाेन’मध्ये उत्सवात लाऊडस्पीकर लावण्यास मुंबई हायकोर्टाने स्थगिती दिली हाेती. मात्र गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला सर्वाेच्च न्यायालयाने हा अादेश रद्द केला. परिणामी मंगळवारी विसर्जन मिरवणुकीत लाऊडस्पीकर व ढाेल-ताशांचा गजर निनादण्याचा मार्ग माेकळा झाला अाहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... मुंबईतील गणेश विसर्जन मिरवणुकीचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...