आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणपती बाप्पा मोरयाऽऽऽ पुढच्या वर्षी लवकर याऽऽऽ, PHOTOS मधून पाहा मुंबईतील विसर्जन मिरवणूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 'गणपती बाप्पा मोरयाऽऽऽ पुढच्या वर्षी लवकर याऽऽऽ, च्या जयघोषात मुंबई, पुण्यासह राज्यभरातील सार्वजनिक गणपतींना आज (मंगळवारी) निरोप दिला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरच्या गणपतीचे शासकीय निवासस्थानातील कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले.

चिंचपोकळीचा चिंतामणी गिरगाव चौपाटीच्या दिशेने रवाना झाला आहे. त्याआधी परळचा राजा दिमाखात पुढे निघाला आहे. पुष्पवृष्टी करुन मुंबईच्या राजा अर्थात‍ गणेश गल्लीच्या राजाची मिरवणूक सुरु झाली आहे. तसेच कोळी नृत्याने लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. लालबागच्या राजा दिमाखात मार्गस्थ झाला असून स्वागतासाठी गेटसमोर 200 रुपयाच्या नोटांचा हार लावण्यात आला आहे.

मुंबईतील विसर्जन मिरवणुकीचे फोटो पाहाण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...