आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Gang rape Accused Siraj Missing From Thane Jail

शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी ठाणे कारागृहातच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शक्ती मिलमध्ये वृत्तछायाचित्रकार तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी सिराज रेहमान खान ठाणे कारागृहातून पळून गेल्‍याची अफवा पसरली होती. परंतु, तो तुरुंगातच असल्‍याचे तुरुंग अधीक्षकांनी स्‍पष्ट केल्‍यानंतर सुरक्षा यंत्रणांना हायसे वाटले.

गुजरातमध्ये बॉम्बस्फोटांची मालिका घडवून आणणाऱ्या इंडियन मुजाहिदीन या संघटनेचा सक्रिय सदस्य अफझल मुतालीब उस्मानी हा दहशतवादीदेखील नुकताच पोलिसांच्या हातावर तुरी देत मोक्का कोर्टातून पसार झाला होता. त्‍यानंतर आज बलात्‍कार प्रकरणातील आरोपी सिराजही फरार झाल्‍याची अफवा पसरली. त्‍याचा शोध सुरु झाला. त्‍यावरुन गुन्‍हे शाखा आणि ठाणे पोलिसांमध्‍ये संभ्रम निर्माण झाला. सिराज कोणाच्‍या कोठाडीत आहे, यावरुन मोठा गोंधळ उडाला. अखेर तळोजा येथील तुरुंगाधिका-यांशी संपर्क साधल्‍यानंतर सिराज तुरुंगातच असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. आज त्‍याला न्‍यायालयात हजर करण्‍यात येणार होते. परंतु, सुरक्षारक्षकांच्‍या अपु-या संख्‍येमुळे त्‍याला न्‍यायालयात नेण्‍यात आले नाही.

शक्ती मिल प्रकरणी चार आरोपींविरुद्ध अतिरिक्त महानगर दंडाधिकारी न्यायालयात सहाशे पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पाचव्या अल्पवयीन आरोपीविरुद्ध ज्युवेनाइल न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले आहे.

महालक्ष्मी येथील शक्ती मिलमध्ये सहकार्‍यासोबत वार्तांकनासाठी गेलेल्या 23 वर्षीय छायाचित्रकार तरुणीवर पाच जणांनी 22 ऑगस्ट रोजी बलात्कार केला होता. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार म्हणून कासीम बंगाली, सलीम अन्सारी, विजय जाधव, सिराज रेहमान खान यांना अटक केली होती. तसेच, एका अल्पवयीन आरोपीलादेखील ताब्यात घेतले होते. सामूहिक बलात्कार, अनैसर्गिक कृत्ये करणे व करण्यास भाग पाडणे, धमकावणे, मारहाण करणे व कट रचणे असे गुन्हे आरोपींविरुद्ध दाखल आहेत. तरुणीचा वैद्यकीय अहवाल, आरोपींचा डीएनए , फोरेन्सिक अहवाल, बोटांचे ठसे व तज्ज्ञांचे अहवाल न्यायालयापुढे सादर करण्यात आले आहेत.