आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Gang Rape Case: Four Criminal Identified By Viticm Girl

मुंबई सामुहिक बलात्कार प्रकरण: चारही नराधमांना तरुणीने ओळखले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - छायाचित्रकार तरुणीवर सामूहिक बलात्कार करणा-या चारही आरोपींची शुक्रवारी ओळख परेड घेण्यात आली. या वेळी पीडित तरुणी व तिच्या पुरुष सहका-याने चौघांनाही ओळखले. दक्षिण मुंबईतील भायखळा तुरुंगात आरोपी सलीम अन्सारी, विजय जाधव, सिराज रहमान खान आणि कासीम बंगाली यांना शुक्रवारी इतर कैद्यांसोबत रांगेत उभे करण्यात आले.


या वेळी पीडित तरुणी आणि तिच्या सहका-याने चौघांना सहज ओळखले. या प्रकरणी पाचव्या अल्पवयीन आरोपीची डोंगरी येथील बाल न्यायालयात बुधवारी ओळख परेड घेण्यात आली होती. त्यामुळे सबळ पुरावे मिळतील, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. 22 ऑगस्ट रोजी पाच आरोपींनी बलात्कार केला होता.