आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Gang Rape Case: Fourh Offenders Court Custody Still 19 September

मुंबई सामुहिक बलात्कार: चारही आरोपींना 19 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - छायाचित्रकार तरुणीवरील सामूहिक बलात्कारप्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या चारही आरोपींना सत्र न्यायालयाने गुरुवारी 19 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.


सिराज रहमान खान, विजय जाधव, सलीम अन्सारी आणि कासीम बंगाली यांना सत्र न्यायाधीश यू. एम. पडवळ यांच्या पीठापुढे हजर करण्यात आले होते. आरोपींची ओळख परेड करण्याची परवानगी पोलिसांनी मागितली. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला डोंगरी येथील बालन्यायालयात 30 ऑगस्ट रोजी हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे. त्याला कमाल तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते.


22 ऑगस्ट रोजी पीडितेवर पाच जणांनी शक्ती मिल येथे सामूहिक बलात्कार केला होता. तसेच अन्य एका युवतीवरही नराधमांनी अत्याचार केल्याचे उघड झाले आहे.