आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई स‍ामुहिक बलात्कार: बेदम चोप मिळूनही नराधमाकडून दुष्कृत्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- छायाचित्रकारावरील सामूहिक बलात्कार प्रकरणातील एक आरोपी विजय जाधव याला दोन आठवड्यांपूर्वीच महिलेची छेड काढल्याप्रकरणी कुर्ला स्थानकाबाहेर नागरिकांनी बेदम चोप दिला होता. मात्र, या प्रकारावरूनही धडा न घेतलेल्या विजयने दुष्कृत्य करत कुटुंबीयांची मान शरमेने झुकवली.
विजयचे कुटुंब विरार (पूर्व) येथील कोपरी गावातील फ्लॅटमध्ये एक वर्षापासून भाड्याने राहते. दोन आठवड्यांपूर्वी त्याला कुर्ला स्थानकाबाहेर नागरिकांनी बेदम मारले होते, अशी माहिती त्याच्या आईने दिली. वाईट मित्रांच्या संगतीत असल्याने आधीच नाराज असलेल्या कुटुंबीयांनी विजयच्या मोबाइलमध्ये अश्लील व्हिडिओ सापडल्यामुळे त्याला घरातून हाकलून दिले होते. तेव्हापासून त्याच्याशी फारसा संबंध नव्हता. मात्र, तरीही तो अधूनमधून भेटायला यायचा, असे त्याचा भाऊ सचिनने सांगितले.
कुटुंबीयांना घर सोडण्याची धमकी
विजयच्या कृत्याचा त्रास त्याच्या कुटुंबीयांना सोसावा लागत आहे. ते राहत असलेल्या जय अंबे पार्कमधील रहिवाशांनी त्यांना दोन दिवसांत घर रिकामे करण्यास सांगितले आहे. नराधमाचे कुटुंब आमच्या इमारतीमध्ये राहते ही शरमेची बाब असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. असे असले तरी बलात्काराच्या प्रकरणाशी आपल्या मुलाचा संबंध नसल्याचे विजयच्या आईचे म्हणणे आहे. मित्र त्याला अडकवत असून विजय असे कृत्य कधीच करणार नसल्याचा त्यांना विश्वास वाटतो.